AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका खासदारावर अजित पवारांना हवे कॅबिनेट मंत्रीपद, दुसरीकडे शिंदेंनी सात खासदारांवर घेतले राज्यमंत्रीपद

Narendra Modi Oath Ceremony : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. परंतु नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे एका खासदारचे बळ असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवे आहे.

एका खासदारावर अजित पवारांना हवे कॅबिनेट मंत्रीपद, दुसरीकडे शिंदेंनी सात खासदारांवर घेतले राज्यमंत्रीपद
ajit pawar and eknath shinde
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 10, 2024 | 7:13 AM
Share

Narendra Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागा महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र लढल्या. परंतु या निवडणुकीत महायुतीवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने ९ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला. भाजपला लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळाली नाही. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच पक्षांना घेऊन भाजपला सरकार चालवावे लागणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातून सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेनेला एक-एक मंत्रीपद देण्यात आले होते. परंतु राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मंत्रीपद मिळत असल्याने एक खासदार असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाने तुर्त मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला. परंतु शिवसेनेकडे सात खासदार असताना त्यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारले. शिवसेनेते बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रतापराव जाधव यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हे स्पष्ट झाले. जाधव यांनी राज्यमंत्री म्हणून पाचव्या क्रमांकावर शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणत्याही नेत्यास मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे यासंदर्भात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव देण्यात आले होते. प्रफुल्ल पटेल यापूर्वी केंद्रात कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे त्यांच्याकडून कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी झाली. परंतु आघाडी सरकारमध्ये तुर्त त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणे शक्य नव्हते. त्यामुळे राज्यमंत्रीपद त्यांना देण्यात आले होते. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद दिले तर इतर घटक पक्षांवर अन्याय करण्यासारखे होईल. परंतु ते स्वीकारण्यास राष्ट्रवादीकडून नकार देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी मंत्र्याचा शपथविधी झाला नाही.

अजित पवार म्हणतात, थांबण्यास तयार…

अजित पवार यांनी या प्रकारणावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी पक्षातील सर्व नेत्यांसोबत चर्चा केली. आमच्या सर्वांचे ठरले कॅबिनेटनची जागा प्रफुल्ल पटेल यांना मिळावी. कॅबिनेट मंत्रीपद द्यावे नाहीतर आमची थांबण्याची तयारी आहे. आमची थांबण्याची तयारी म्हणजे एनडीए सोबत राहणार नाही, असे नाही. आम्ही एनडीएसोबत राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. परंतु शिंदे सेना सात खासदारांवर राज्यमंत्रीपद घेत असताना राष्ट्रवादीने एका खासदारचे बळ असताना त्यास नकार दिल्याने चर्चा सुरु झाली आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक