Aamir Khan: गळ्यात शॉल, डोक्यावर टोपी.. ‘या’ लूकमध्ये आमिर खानला ओळखणंही कठीण!

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Dec 09, 2022 | 11:21 AM

'एका क्षणासाठी तो आमिर असल्याचं कळलंच नाही', पूजेच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

Dec 09, 2022 | 11:21 AM
अभिनेता आमिर खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव यांनी मिळून नुकतीच कलश पूजा केली. आमिर खान प्रॉडक्शन्स कंपनीत दोघांनी हिंदू पद्धतीनुसार ही पूजा आणि आरती केली. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी या पूजेचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 6
या फोटोंमधील आमिरचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. यावेळी आमिरचा स्वेटशर्ट आणि डेनिमवर शॉल, डोक्यावर टोपी असा हा लूक होता. एका क्षणासाठी तो आमिर आहे हे कळलंच नाही, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

2 / 6
आमिर आणि किरणला पूजा करताना पाहून चांगलं वाटलं, असंही काहींनी म्हटलंय. तर पूजेनिमित्त का होईना आमिर आणि किरणला एकत्र पाहून बरं वाटलं, असं एका युजरने लिहिलंय.

3 / 6
काही दिवसांपूर्वीच आमिरने एका मुलाखतीला हजेरी लावली होती. त्यावेळी पहिल्यांदा त्याचा दाढी-मिशी वाढलेला वेगळा लूक पहायला मिळाला. त्यानंतर मुलगी आयरा खानच्या साखरपुड्यातही आमिर याच लूकमध्ये दिसला.

4 / 6
तुला म्हातारं होत असताना पाहणं खूप कठीण आहे, असं काही चाहत्यांनी त्याच्या लूकवर म्हटलं होतं. तर काहींना आमिरचा हा लूक खूपच आवडला.

5 / 6
आमिरने सध्या चित्रपटांतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्याने म्हटलंय.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI