AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवन अनिश्चित…, एअर इंडिया विमान अपघातात अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

Amitabh Bachchan on Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातात अमिताभ बच्चन यांनी देखील जवळच्या व्यक्तीला गमावलं, पोस्ट करत म्हणाले, 'जीवन अनिश्चित', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टती चर्चा...

जीवन अनिश्चित..., एअर इंडिया विमान अपघातात अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
फाईल फोटो
| Updated on: Jun 15, 2025 | 2:11 PM
Share

Amitabh Bachchan on Air India Plane Crash: महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशलम मीडियाच्या माध्यमातून बिग बी कायम सामाजिक आणि चालू घटनांवर प्रतिक्रिय देत असतात. पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरनंतर अमिताभ बच्चन फक्त ब्लँक ट्विट करत होते. पण आता अहमदबाद याठिकाणी झालेल्या अपघातानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विमान अपघातावर दुःख व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे असं वक्तव्य केलं आहे.

अमिताभ बच्चन ट्विट करत म्हणाले ‘घोर अंधेरा…’, बिग बींनी अशी पोस्ट केल्यानंतर लोकं त्यांच्या पोस्टला एअर इंडियाच्या विमान अपघाताशी जोडत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

एवढंच नाही तर, बिग बींनी ब्लॉगमध्ये देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जीवनात एक गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे जीवन अनिश्चित आहे…’ अमिताभ यांनी सांगितलं की, हा संदेश त्यांच्या एका चाहत्याने त्यांना पाठवला होता. यापूर्वी अमिताभ यांनी एअर इंडियाच्या विमान अपघातात 270 जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारा ब्लॉग लिहिला होता.

ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिल्यानुसार, ‘एयर इंडिया अपघातामुळे मला प्रचंड दुःख झालं असून व्यथित आहे. या अपघातात ज्या देशांनी आपले नागरिक गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझी पूर्ण सहानुभूती आणि पाठिंबा आहे. मी प्रार्थना करतो की हे दुःख आपल्याला एकत्र आणेल, जेणेकरून आपण सर्वजण एकत्रितपणे मृतांना श्रद्धांजली अर्पण करू शकू.’

पुढे बिग बी म्हणाले, ‘या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. जेणेकरुन आपण कायम लक्षात ठेऊ आणि काही धडा शिकू… आपल्याला खंबिर राहिलं पाहिजे. योग्य पावले उचलावी लागतील आणि लवकरात लवकर शिकावे लागेल, जेणेकरून सर्वांना या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करता येईल.’ या अपघातात अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राच्या मुलाचाही मृत्यू झाला, ज्याच्या निधनानंतर बिग बी भावुक झाले.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.