Aryan Khan Granted Bail | मुलाला जामीन मिळताच शाहरुख खानने घेतली वकिलांची भेट

आर्यनला जामीन मिळावा म्हणून ज्येष्ट वकील मुकुल रोहतगी यांनी जिवाचं रान करून कोर्टासमोर बाजून मांडली. कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आता अभिनेता शाहरुख खान याने वकिलांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सध्या समोर आले आहेत.

Aryan Khan Granted Bail | मुलाला जामीन मिळताच शाहरुख खानने घेतली वकिलांची भेट
shah rukh khan meets advocates

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळाला आहे. तब्बल 25 दिवसांपासून कारागृहात असलेला आर्यन लवकरच बाहेर येणार आहे. आर्यनला जामीन मिळावा म्हणून ज्येष्ट वकील मुकुल रोहतगी यांनी जिवाचं रान करून कोर्टासमोर बाजून मांडली. कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आता अभिनेता शाहरुख खान याने वकिलांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सध्या समोर आले आहेत.

25 दिवसानंतर आर्यनला जामीन, शाहरुखने घेतली वकिलांची भेट

गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाच्या याच निकालानंतर अभिनेता शाहरुख खान हर्षोल्हासित झाला आहे. मुलाला जामीन मिळाल्याचा आनंदात त्याने आपल्या वकिलांची भेट घेतली आहे. तसेच त्याने विकालांचे आभार मानले आहेत.

फोटोमध्ये कोण आहेत ?

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखने त्यांच्या कायदाविषयक सल्लागार तसेच आर्यनला जामीन मिळावा म्हणून बाजू मांडणाऱ्या वकिलांची भेट घेतली. समोर आलेल्या फोटोंमध्ये शाहरुख खानसोबत अॅड. अमित देसाई, अॅड. सतीश मानेशिंदे तसेच इतर टीम दिसत आहे.

 

 

तणाव आणि थकवा

शाहरुखने वकिलांची भेट घेतल्यानंतर या भेटीचे फोटो सध्या समोर आले आहेत.  शाहरुख खान या फोटोत अत्यंत थकलेला दिसत आहे. पांढरा टीशर्ट आणि ट्राऊजरमध्ये असलेल्या शाहरुखच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही स्पष्टपणे जाणवत आहे. तसेच मुलाच्या अटकेमुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं दिसत आहे. या फोटोत तो अत्यंत बारीक दिसत आहे. या फोटोत शाहरुख हसताना दिसत आहे. मुलगा तब्बल 25 दिवसानंतर बाहेर आल्यामुळे सध्यातरी शाहरुख आनंदीत असल्याचे दिसत आहे. मात्र, आर्यन तुरुंगातून बाहेर आलेला असला तरी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया पार पडलेली नाही. जामीन मिळाला असला तरी आर्यन खान आणि ड्रग्ज पार्टीचा खटला सुरुच राहणार आहे, कदाचित याच कारणामुळे फोटोमध्ये दिसणारा शाहरुख खान थोडा थकलेला दिसतोय.

इतर बातम्या :

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप, कोण आहे दाढीवाला कासिफ खान?

फेसबुकवरील मैत्रीला भुलली, गिफ्टच्या नावाखाली 9 लाखांचा गंडा, पुण्यात उच्चशिक्षित तरुणी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला 25 दिवसांनी जामीन, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

(aryan khan granted bail in cruise rave drug party actor shah rukh khan meets mukul rohatgi and his team photo went viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI