अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबद्दल नातवाचा अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाला, नाना ज्यावेळी घरात..
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. ‘कौन बनेगा करोडपती 17 च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा नुकताच आला होता. यावेळी त्याने काही मोठे खुलासे केले.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग असून सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात. ‘कौन बनेगा करोडपती 17’च्या माध्यमातून अमिताभ बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सुरूवापासून अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपतीसोबत जोडले गेले आहेत. शोदरम्यान अमिताभ बच्चन यांना प्रेक्षक त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसतात. काही लोक तर काैन बनेंगा करोडापती शो हा अमिताभ बच्चन यांच्यासाठीच बघतात. एक नवा अंदाज अमिताभ बच्चन यांचा काैन बनेगा करोडपतीच्या मंचावर बघायला मिळतो. नुकताच इक्कीस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा कौन बनेगा करोडपतीमध्ये पोहोचला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन देखील उपस्थित होती.
अगस्त्य नंदा याचा हा दुसरा मोठा चित्रपट आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहे. यावेळी अगस्त्य नंदा याने आजोबा अमिताभ बच्चन यांची चांगलीच पोलखोल केली. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जगाला माहिती नसलेल्या गोष्टी अगस्त्य याने सांगितल्या. यावेळी तो आजी जया बच्चन यांच्याबद्दलही बोलताना दिसला.
घरात नक्की वातावरण कसे असते हे देखील त्याने सांगितले. अगस्त्य नंदा म्हणाला की, काैन बनेगा करोडपतीमध्ये येणे आणि हॉटसीटवर बसणे हे माझ्यासाठी नक्कीच पॅरेट्स टीचर मीटिंगसारखे आहे. सेटवर अमिताभ बच्चन कसे वागतात आणि घरी कसे यावर बोलताना अगस्त्य दिसला. अगस्त्य नंदा म्हणाला की, नाना सेटवर इथे खूप मजा मस्ती आणि हसी मजाक करताना दिसतात. मात्र, उलट ते घरी असतात.
घरी ते कायम गंभीर असतात. म्हणजे खरोखरच त्यांचे घरातील वागण आणि इथलचे वागणे बघून मला आर्श्चय वाटले. पुढे बोलताना अगस्त्य नंदा याने म्हटले की, नानी अर्थात जया बच्चन खूप जास्त शिस्तप्रिय आहेत. पहिल्याच हा खुलासा झाला की, अमिताभ बच्चन घरी एकदम गंभीर आणि शांत असतात. अगस्त्य नंदा हा त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ त्याच्या चित्रपटाबद्दल आहे.
