First Photo | अमृता राव-आरजे अनमोलने शेअर केला बाळाचा फोटो, पाहा ‘वीर’ची पहिली झलक!

अमृता आणि अनमोलने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावरही मुलाच्या नावाची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत तिने चाहत्यांना मुलाची पहिली झलक दाखवली नव्हती. आता अमृताचा पती, अर्थात आरजे अनमोलने मुलाचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Mar 18, 2021 | 4:13 PM
Harshada Bhirvandekar

|

Mar 18, 2021 | 4:13 PM

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव नुकतीच आई झाली आहे. अमृताला मुलगा झाल्याची बातमी चांगलीच चर्चेत होती. अभिनेत्री अमृता राव आणि आर.जे.अनमोल 2020मध्ये पहिल्यांदाच पालक बनले आहेत. यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला होता.

1 / 6
अमृता आणि अनमोलने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावरही मुलाच्या नावाची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत तिने चाहत्यांना मुलाची पहिली झलक दाखवली नव्हती. आता अमृताचा पती, अर्थात आरजे अनमोलने मुलाचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अमृता आणि अनमोलने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावरही मुलाच्या नावाची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत तिने चाहत्यांना मुलाची पहिली झलक दाखवली नव्हती. आता अमृताचा पती, अर्थात आरजे अनमोलने मुलाचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

2 / 6
लॉकडाऊन दरम्यान अमृताने आपला पती आरजे अनमोलसोबत एक फोटो शेअर केला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी हा 9 वा महिना आहे. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज… अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात आहोत.’

3 / 6
अमृता राव आणि अनमोल यांनी आपल्या मुलाचे नाव वीर ठेवले आहे. या अभिनेत्रीने मुलाचे नाव जाहीर करताना एक चिमुकला हात तिच्या पोस्टमध्ये शेअर केला आणि लिहिले, ‘हॅलो वर्ल्ड, आमच्या मुलाला ‘वीर’ला भेटा. त्याला तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद हवा आहे.’ आता तिच्या मुलाचा पहिला फोटो समोर आला आहे.

4 / 6
अनमोलने आता पहिल्यांदाच मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अखेर 4 महिन्यांनंतर दोघांनीही मुलाचा लेकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमृता आणि आरजे अनमोलने मुलगा वीरसमवेत एक खास फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना अनमोलने लिहिले की, ‘आपले जग, आपले आनंद. # वीर’ या फोटोमध्ये आपण तिघांनाही हसताना पाहू शकता. चिमुकल्या वीरचे हास्य खूप गोंडस असून, त्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

5 / 6
अमृता आणि अनमोलने 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2016 मध्ये लग्न केले होते. एका खासगी सोहळ्यात त्यांचे लग्न पार पडले होते. या सोहळ्यात केवळ घरातील लोक आणि जवळचे मित्र सामील झाले होते. खरोखरच, अमृता आणि अनमोलची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें