‘अभिषेक, तूच माझा उत्तराधिकारी, बस कह दिया तो कह दिया’; ट्रोलर्सना Amitabh Bachchan यांचं सणसणीत उत्तर

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) लवकरच 'दसवी' (Dasvi) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाला दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यातील अभिषेकच्या अभिनयाची चर्चा होत आहे.

'अभिषेक, तूच माझा उत्तराधिकारी, बस कह दिया तो कह दिया'; ट्रोलर्सना Amitabh Bachchan यांचं सणसणीत उत्तर
Abhishek Bachchan and Amitabh BachchanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 4:15 PM

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) लवकरच ‘दसवी’ (Dasvi) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाला दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यातील अभिषेकच्या अभिनयाची चर्चा होत आहे. अभिषेकला आजवर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलंय. वडिलांकडून काहीच शिकला नाही, त्यांच्या तोडीचं काम करू शकला नाही अशा शब्दांत त्याच्यावर टीका झाली. वेळोवेळी अभिषेकनेही ट्रोलर्सना उत्तर दिलं. मात्र दसवीचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर खुद्द अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अप्रत्यक्षपणे टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलंय आणि दुसरीकडे आपल्या मुलाच्या कामाचं कौतुक केलंय. वडील हरिवंश राय बच्चन यांच्या ओळी लिहित बिग बींनी अभिषेकला आपला उत्तराधिकारी असल्याचं म्हटलंय.

अमिताभ बच्चन यांचं ट्विट-

‘माझी मुलं, मुलं असल्याने माझे उत्तराधिकारी नाही होणार, जे माझे उत्तराधिकारी असतील ती माझी मुलं असतील’, अशा आशयाच्या हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेल्या ओळी पोस्ट करत त्यांनी पुढे अभिषेकसाठी लिहिलं, ‘अभिषेक, तू माझा उत्तराधिकारी आहेस, बस कह दिया तो कह दिया’| या ट्विटमध्ये त्यांनी अभिषेकच्या दसवीचा ट्रेलरसुद्धा शेअर केला आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत. वडिलांच्या या ट्विटवर अभिषेकने लिहिलं, ‘लव्ह यू पा, नेहमीच’.

बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अभिषेकबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ‘पित्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे त्याच्या मुलांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होणं, त्यांचा गौरव होताना पाहणं. बाबूजींच्या वसियतनामा या कवितेतील या ओळींचं उदाहरण मी अनेकदा दिलं आहे आणि मी अभिमानाने सांगतो की अभिषेक हा माझा उत्तराधिकारी आहे. त्याचे सततचे प्रयत्न, विविध भूमिका साकारण्याचं त्याचं धाडस हे फक्त आव्हानच नाही तर सिनेमाच्या जगाला दाखवलेला आरसा आहे. जे लोक दुसऱ्यांवर टीका करतात आणि त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यामध्येच स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता नसते,’ अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना थेट उत्तर दिलं आहे.

हेही वाचा:

फोटोसाठी कायपण! प्रेग्नंट अभिनेत्रीने घातले हाय हिल्स; नेटकऱ्यांनी ट्रोल करताच म्हणाली..

The Kashmir Files कोरोनानंतरचा ब्लॉकबस्टर चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ला ही कमाईत टाकलं मागे

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.