AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खानच्या शरीरात गेलेल्या चाकूच्या तुकड्याचा पहिला फोटो समोर

Saif Ali Khan Attacked: शाहिदच्या घरात आरोपी 1:37 वाजता जातो आणि त्यानंतर 2:33 वाजता खाली उतरतो, असे सीसीटीव्हीमधून उघड झाले आहे. म्हणजे जवळपास 50 ते 55 मिनिटे आरोपी सैफ अली खान याच्या घरात होता.

सैफ अली खानच्या शरीरात गेलेल्या चाकूच्या तुकड्याचा पहिला फोटो समोर
लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खान यांच्या शरीरातून काढलेला चाकूचा तुकडा.
| Updated on: Jan 17, 2025 | 3:38 PM
Share

Saif Ali Khan Attacked: बॉलीवू़ड स्टार सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहत्या घरात गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्ला झाला. त्यावेळी जखमी झालेल्या सैफ यांना रिक्षेने त्यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान डगमगले नव्हते. त्यांनी कमालीचे धाडस दाखवले. रुग्णालयात पोहचल्यावर त्यांनी स्ट्रेचर घेतले नाही. मुलाला घेऊन ते स्वत: चालत आल्याचे आम्ही पाहिले, असे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सैफ यांच्या पोटात चाकूचा तुकडा होतो. तो शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सैफ अली खानच्या अंगावर चोरट्याने एकूण सहा वार केले होते. पहिला वार गळ्यावर केला. इतर वार हे हातावर, पाठीवर केले होते. त्यापैकी शेवटचा सहावा वार हा सैफच्या स्पायनल कॉडवर केला होता. साडेसहा सेंटीमीटरपर्यंतचा हिस्सा शरीराच्या आतमध्ये घुसला होता. स्पायनल कॉडची जी मुख्य रक्तवाहिनी होती तिच्या पासून 2 मीमीच्या दूर हा चाकूचा तुकडा अडकला होता. जर हा तुडका दोन मीमी जास्त आतमध्ये घुसला असता तर पॅरालसीसी होण्याची शक्यता होती.

अन्यथा गंभीर दुखापत झाली असती

सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरात हल्ला झाला. त्या हल्ल्यात त्यांच्या पोटात चाकूचा तुकडा गेला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन तो चाकूचा तुकडा बाहेर काढला आहे. चाकू अजून खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देत सांगितले, चाकू २ मिमी अजून गेला आत गेला असता तर सैफ यांना गंभीर दुखापत झाली असती. सैफ अली खान यांनी शस्त्रक्रियाच्या वेळी आणि त्यापूर्वी चांगले धाडस दाखवले. रुग्णालयात दाखल होत असताना ते स्वत: चालत आले. त्यांनी स्ट्रेचर घेतले नाही. त्यांची प्रकृती स्टेबल आहे.

पोलिसांकडून एकास अटक

सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयीत आरोपीला पकडले आहे. त्याचे नाव शाहिद आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. आरोपी शाहिद याला गिरगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. शाहिदवर या आधी ३-४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. परंतु शाहिद सैफ अली खान प्रकणातील आरोपी आहे की काय हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, आम्ही लवकरच हे प्रकरण उघडकीस आणू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपी शाहिद याचे शेवटचे लोकेशन प्रभादेवी सापडले होते. शाहिद हा सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आहे का? त्याचा शोध पोलीस घेत आहे. शाहिदच्या घरात आरोपी 1:37 वाजता जातो आणि त्यानंतर 2:33 वाजता खाली उतरतो, असे सीसीटीव्हीमधून उघड झाले आहे. म्हणजे जवळपास 50 ते 55 मिनिटे आरोपी सैफ अली खान याच्या घरात होता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.