Hrithik Saba: आता It’s Official असंच म्हणावं लागेल; करण जोहरच्या पार्टीत हृतिक-सबाच्या एण्ट्रीने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी हजर होते. या सेलिब्रिटींच्या मांदियाळीत हृतिक रोशन आणि सबा आझाद (Hrithik Roshan and Saba Azad) यांच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं.

May 26, 2022 | 1:21 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 26, 2022 | 1:21 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी हजर होते. या सेलिब्रिटींच्या मांदियाळीत हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं.

1 / 10
हृतिक हा अभिनेत्री सबाला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. मात्र आता बॉलिवूड पार्टीला एकत्र हजेरी लावत या दोघांनी आपलं नातं जगजाहीर केलंय, असं म्हणायला हरकत नाही.

2 / 10
या दोघांना सर्वांत आधी एका हॉटेलबाहेर एकत्र पाहिलं गेलं. त्यानंतर मुंबई विमानतळावर हृतिक आणि सबा हातात हात घालून दिसले.

3 / 10
हृतिकच्या कौटुंबिक गेट-टुगेदरमध्येही सबा हजर होती. त्यामुळे या दोघांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या.

4 / 10
हृतिक आणि सबामधील वयाचं अंतरही नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांमध्ये जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे.

5 / 10
एकीकडे हृतिकने सबासोबत एण्ट्री केली, तर दुसरीकडे हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हीसुद्धा बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसोबत पार्टीमध्ये दिसली.

6 / 10
हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.

7 / 10
हृतिकने 2000 मध्ये सुझान खानशी लग्न केलं. या दोघांना रेहान आणि हृदान ही दोन मुलं आहेत. जवळपास 13 वर्षांच्या संसारानंतर 2013 मध्ये हृतिक आणि सुझानने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

8 / 10
आता हृतिक सबाला डेट करत आहे, तर सुझान ही अभिनेता अर्सलान गोणीला डेट करतेय. अर्सलान हा बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे.

9 / 10
सबा आझादचं खरं नाव सबा सिंग गरेवाल आहे. भारतातील प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि कम्युनिस्ट नाटककार सफदर हाश्मी यांची ती भाची आहे.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें