CBIचे अधिकारीही हैराण झाले; 800 किलो चांदी, 28 किलो सोन्यानं भरलेलं कपाट;देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून आजही तिची ओळख आहे. या अभिनेत्रीकडे असणाऱ्या संपत्तीचा आकडा आजपर्यंत कोणत्याच अभिनेत्रीला मोडता आलेल नाहीये. तिच्याएवढी श्रीमंत कदाचित कोणाचीच नसेल. या अभिनेत्रीकडे सोने-चांदी आणि साड्यांनी कपाटं भरलेली असायची

आजकाल बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींमध्ये चित्रपटांच्या मानधनावरून चढाओढ सुरु असलेली दिसते. तसेच आतापर्यंत कोणत्या अभिनेत्रीची संपत्ती किती असं विचारण्यात आलं तर बरीच नावे पुढे येतील. पण एका रिपोर्टवरून जुही चावलाची संपत्ती बॉलिवूडमध्ये सर्वांपेक्षा जास्त असून सध्या जुही चावला देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. पण अशीही एक अभिनेत्री होती, जी खूप श्रीमंत होती. तिच्याएवढी श्रीमंत कदाचित कोणाचीच नसेल अगदी जुही चावलाचीही देखील. ही अभिनेत्री म्हणजे जयललिता.
- Jayalalitha was the richest actress in India
देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
जयललिता तमिळ आणि तेलुगू सिनेमाच्या सुपरस्टार अभिनेत्री होत्या. बॉलिवूडमध्येही जयललिता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. एमजीआर यांना जयललिता गुरू मानायच्या. एमजीआर यांच्यासोबत जयललिता यांनी जवळपास 28 चित्रपट केले होते.
- Jayalalitha was the richest actress in India
जयललिता या त्यांच्या काळी टॉपच्या अभिनेत्री होत्या तसेच त्यांना सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जयललिता यांनी कमावलेली ही संपत्ती चित्रपटांच्या माध्यमातून नाही तर सर्वात जास्त त्यांनी कमाई केली ती राजकारणात गेल्यानंतर. त्यांची एवढी संपत्ती होती की लोकं अवाक् व्हायचे.
संपत्ती पाहून सीबीआयचे अधिकारीही हैराण
जयललिता यांच्याकडे अनेक महागड्या साड्या आणि बूट, चप्पल होते. एवढच नाही तर त्यांचे कपाट हे 800 किलो चांदी, 28 किलो सोने, 10 हजार साड्यांनी भरलेलं असायचं. सीबीआयनं ज्यावेळी त्यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा या सगळ्या वस्तू असल्याचे समोर आले होते. तसेच 28 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं.
- Jayalalitha was the richest actress in India
1997 मध्ये, जयललिता यांच्या चेन्नईतील पोस गार्डन येथील घरावर छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, त्यांनी 188 कोटी रुपयांची संपत्ती दाखवली होती, पण प्रत्यक्षात त्यांनी एकूण 900 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली होती. म्हणजे जवळपास ती आजच्या हिशोबाने 5 हजार कोटींची संपत्ती असेल. तसेच या छाप्यामध्ये सोने-चांदीसह त्यांच्याकडे तब्बल 10 हजार 500 महागड्या साड्या, 750 बुटांचे जोडही सापडले होते.
- Jayalalitha was the richest actress in India
संपत्तीचा आकडा मोडणे आजही कठीण
जयललिता यांची संपत्ती आजही सर्वांपेक्षा जास्तच आहे. आजही त्यांच्या संपत्तीचा आकडा कोणत्याच अभिनेत्रीला मोडता आला नाहीये. जयललिता यांच्या जीवनावर बायोपकही काढण्यात आला. अभिनेत्री कंगना रणौतने जयललिता यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारली होती. पण आजही जयललिता यांची क्रेझ आणि लोकांच्या मनातील त्यांच्याबद्दलचे प्रेम तसेच आहे.
