कट्टर हिंदू कधीच बीफ खात नाही, कंगना रोखठोक बोलली; चाहत्यांकडून जुने ट्विट व्हायरल करत ट्रोलिंग

kangana ranaut | कंगना रनौत, कट्टर हिंदू, बीफ आणि बरंच काही... अभिनेत्री अखेर रोखठोक बोलली; चाहत्यांकडून जुने ट्विट व्हायरल करत ट्रोलिंग... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

कट्टर हिंदू कधीच बीफ खात नाही, कंगना रोखठोक बोलली; चाहत्यांकडून जुने ट्विट व्हायरल करत ट्रोलिंग
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 1:41 PM

अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच. कंगना हिने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केलं आहे. ‘कंगना हिला बीफ खायला आवडतं आणि भाजप पक्षाने तिला तिकिट दिलं आहे…’, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. यावर उत्तर देत कंगना हिने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे कंगना रनौत आणि बीफ वादाने डोकंवर काढलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

कंगना म्हणाली, ‘मी बीफ किंवा कोणत्याही प्रकारचं रेड मीट खात नाही. माझ्याबद्दल ज्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी अनेक दशकांपासून योगिक आणि आयुर्वेदिक जीवनपद्धतीचा प्रचार करत आली आहे, आता अशा युक्त्या माझी प्रतिमा डागाळण्यासाठी काम करणार नाहीत.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी कशी हे माझ्या लोकांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे की, मी कट्टर हिंदू आहे आणि कोणी माझ्या लोकांची दिशाभूल करु शकत नाही… जय श्री राम…’ असं देखली अभिनेत्री म्हणाली. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेत्रीच्या एक्सवर ‘ट्विट’ जुना स्क्रिनशॉट शेअर करत नेटकऱ्यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. सांगायचं झालं तर, 2019 मध्ये अभिनेत्रीने एक ट्विट केलं होतं. ते ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. ‘बीफ किंवा कोणत्या अन्य प्रकारचं मांस खाल्ल्याने काहीही होत नाही. ही धर्माची गोष्ट नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, कंगना रनौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. आता कंगना जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.