Photo : करण मेहराचे विवाहबाह्य संबंध!, पत्नी निशा रावलकडून भांडाफोड

पत्रकारांशी बोलताना निशा म्हणाली, करण मेहराचे विवाहबाह्य संबंध सुरु आहेत हे खरं आहे. (Karan Mehra's extramarital affair, Says wife Nisha Rawal)

1/11
karan nisha
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निशा रावल आणि करण मेहरा नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. निशा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ मधील सौम्या दीवानची भूमिका साकारून चर्चेत आलेल्या निशानं बर्‍याच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर करणला ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेनं खास ओळख मिळवून दिली.
2/11
टीव्ही जगातील सुप्रसिद्ध जोडपं करण मेहरा आणि निशा रावल यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. काही काळापूर्वी अशा अफवा येऊ लागल्या की दोघांमध्ये अनेक वाद आहेत.मात्र आमच्यात सर्व काही ठीक आहे असं करणनं आपल्या वतीनं स्पष्ट केलं होतं. मात्र आता दोघांमधील वाद प्रचंड वाढला.
3/11
karan nisha
सोमवारी रात्री निशा रावलनं करण मेहरा याच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. आता निशा रावलनं या प्रकरणी आपली बाजू मांडली असून करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचं तिनं उघड केलं आहे.
4/11
karan nisha
पत्रकारांशी बोलताना निशा म्हणाली, माझं आणि करणशी तुमचं अनेक वर्षांपासून नातं आहे. आज आपण अशाप्रकारे भेटत आहोत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मी फक्त इथं आले आहे कारण माझा मुलगा मोठा झाल्यावर त्यानं या सर्व चुकीच्या बातम्या वाचाव्यात असं मला वाटत नाही.
5/11
karan nisha
या 14 वर्षांच्या नात्यात बरंच काही घडलं आहे आणि कोणालाही काही माहिती नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा आमच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली तेव्हा करण चंदीगडमध्ये होता. करण मेहराचे विवाहबाह्य संबंध चालू आहेत हे खरं आहे.
6/11
karan nisha
मला हे सांगताना दुःख होतय की करणचे एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत, ज्याची मला कल्पना नव्हती. जेव्हा मी त्याला पुरावा दाखविला तेव्हा त्यानं हे मान्य केलं की हो, माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे.
7/11
karan nisha
निशा पुढे म्हणाली की- मी या नात्याची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं उत्तर होतं की हो, मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याबरोबर माझे शारीरिक संबंधही आहेत. ती मुलगी दिल्लीची आहे. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता.
8/11
karan nisha
काय प्रतिक्रिया द्यावी ते मला समज नव्हतं. मी त्याच्याशी भांडणं करण्याऐवजी प्रेमाने बोलले. दुसर्‍याच दिवशी मी फ्लाइट घेऊन वडिलांकडे गेली, ते म्हणाला की जे काही आहे ते तुम्ही यावर काम करा.
9/11
karan nisha
मी म्हणाले जर करण सॉरी म्हणत असेल तर मी त्यावर काम करेल. त्यानंतरही करणच्या वृत्तीत कोणताही बदल झाला नाही. मी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप देखील तयार केला आहे ज्यात करण आणि मी दोघंच आहोत. त्याला लव्ह प्रोजेक्ट असंही नाव दिलं कारण मला हे सगळं ठीक करायचं होतं.
10/11
karan nisha
यापूर्वी करण मेहरानं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं होतं की- लग्नाच्या इतक्या वर्षानंतर हे घडणं वाईट आहे. आम्ही गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो. निशा आणि तिच्या भावानं मला जास्त पैसे मागीतले जे मला देणं शक्य नव्हते.
11/11
karan nisha
करण पुढे म्हणाला की जेव्हा मी याबद्दल बोलायला गेलो तेव्हा निशानं माझ्या पालकांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. ती जोरात ओरडू लागली. ती माझ्यावर थुंकली आणि मला धमकावले.