AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaat Tuzya Pawalanchi : या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशासाठी लढणाऱ्या एका शूरवीराच्या पत्नीची कहानी, ‘वाट तुझ्या पावलांची’ गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची दाद

दर्जेदार विषय, मनाला भिडणारा अभिनय आणि डोळ्याच्या कडा ओलावणारी मांडणी अशा तिन्ही महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असणाऱ्या 'वाट तुझ्या पावलांची' हे गाणं युट्युब चॅनेल वर रीलीज करण्यात आलं आहे. (The story of the wife of a hero who fought for the country on the occasion of Independence Day, the song 'Vaat Tujya Pawalanchi')

Vaat Tuzya Pawalanchi : या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशासाठी लढणाऱ्या एका शूरवीराच्या पत्नीची कहानी, 'वाट तुझ्या पावलांची' गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची दाद
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 3:19 PM
Share

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) अनेक गाणी, चित्रपट वेब सीरीज आपल्या भेटीला येत आहेत. अशातच महिला सशक्तिकरणावर आधारित ‘वाट तुझ्या पावलांची‘ (Vaat Tuzya Pawalanchi) हे नवं मराठी गाणं आपल्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं अनावरण पुण्याचे महापौर  मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा एक महत्त्वाचा आणि जीवनात नवं वळण घेऊन येणारा प्रसंग आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात वेगवेगळी स्वप्न रंगवते. मात्र देशासाठी लढणाऱ्या एका शूरवीराशी लग्नगाठ बांधलेल्या मुलीच्या मनात एक वेगळीच हुरहूर असते. अर्धांगिनी म्हणून वेगळीच लढाई लढणाऱ्या वीरपत्नींची भूमिका या गाण्यातून मांडण्यात आलीय. त्यांच्या काय भावना असतात, काय काळजी असते, मुलांना मोठं करताना काय अडचणी येतात या सगळ्यावर भाष्य करणारा हा सुंदर व्हिडीओ  आहे. ‘वाट तुझ्या पावलांची’ या गाण्याचं दिग्दर्शन पंकज सतीश साठे यांनी केलंय.

पाहा गाणं (See Video)

दर्जेदार विषय, मनाला भिडणारा अभिनय आणि डोळ्याच्या कडा ओलावणारी मांडणी अशा तिन्ही महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असणाऱ्या ‘वाट तुझ्या पावलांची’ हे गीत युट्युब चॅनेल वर रीलीज करण्यात आलं आहे. एका लढवय्याशी लग्न करून आपली स्वप्न रंगवणाऱ्या एका महिलेची ही गोष्ट आहे. एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून आणि एक स्त्री म्हणून, तिनं सगळे भार सोसले आणि आपल्या लेकीला घडवलंही. ती मात्र शेवटी एकटीच राहिली. असं असूनही ती हरली नाही. ती पुन्हा कशी उभी राहिली आणि नवीन पिढीच्या पावलांना तिनं कशी वाट दाखवली, हे सगळं ‘वाट तुझ्या पावलांची’ या गाण्याच्या व्हिडीओमधून दिसतं.

पतीच्या निधनानंतर आई-वडील अशा दोन्ही भूमिका एक महिला कशी निभावते, याचे भावस्पर्शी वर्णन आणि संगीतकर अमोल घाटे यांनी ओघवत्या शैलीत केलं आहे. तर या गीताला कांचन घाटे यांचे स्वर लाभले आहेत. सायली गिते, अविनाश खेडेकर, ऐश्वर्या शिंदे, मॅडी शेख, या कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

वीर पत्नींचा सन्मान

Vaat Tuzya Pawalanchi

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोल्जर इंडिपेंडंट रिहाबिलीटेशन फाउंडेशन संस्थेच्या सुमेधा चिथडे, वीरपत्नी शीतल जगदाळे ,वीरपत्नी कुंदना आगवण, वीरपत्नी जयश्री शेळके,वीरपत्नी अजिता बागडे,वीरपत्नी सोनाली फराटे उपस्थित होत्या यावेळी वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या

Yeu Kashi Tashi Mi Nandayla |  स्वीटूला बघायला पुन्हा एकदा मुलाकडची मंडळी येणार, आता तरी मुलगी पसंत पडणार?

Devmanus | अखेर रेश्माचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला, वाड्यातील लोकांची पुन्हा चौकशी होणार!

अशी स्तुती सचिन खेडेकरांची तोंडावर कुणीच केली नसेल, इन्सपेक्टर बाई म्हणाल्या, मी आल्यापासून तुम्हालाच बघतेय, बघा खेडेकरांची प्रतिक्रिया

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.