AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढले, रेल्वे स्टेशनवर काढावे लागले दिवस

बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीवर अतिशय वाईट दिवस आले आहेत. लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढण्यात आले. त्यानंतर त्याने रेल्वे स्टेशनवर दिवस काढले. आता हा अभिनेता कोण आहे? जाणून घ्या...

लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढले, रेल्वे स्टेशनवर काढावे लागले दिवस
Roshan LalImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 16, 2026 | 12:24 PM
Share

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहे ज्यांचे आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक अभिनेता तर असा होता ज्याने लव्ह मॅरेज केले म्हणून त्याला नोकरीवरुन काढून टाकले. त्याकाळी या अभिनेत्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. आता हा अभिनेता कोण आहे? चला जाणून घेऊया…

आज ऋतिक रोशन बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारांमध्ये गणला जातो. पण त्याच्या कुटुंबाच्या यशामागे संघर्षाची अशी कहाणी दडलेली आहे, जी फारच कमी लोकांना माहीत आहे. त्याचे आजोबा आणि दिग्गज संगीतकार रोशन (रोशनलाल नागरथ) यांनी हिंदी सिनेमाला अनेक अमर धुन दिल्या आहेत. पण एक काळ असाही होता, जेव्हा प्रेमाची किंमत त्यांना नोकरी गमावून चुकवावी लागली. परिस्थिती इतकी बिघडली की, दोन्ही पत्नींसह रेल्वे स्टेशनवर दिवस काढावे लागले. खिशात पैसे नव्हते, डोक्यावर छत नव्हते, पण त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात एक असा माणूस आला, ज्याने त्याचे आयुष्य बदलून टाकले.

स्टेशनवर बसलेले रोशन…

हा किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक किदार शर्मा यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितला होता. त्यांनी सांगितले की, एक दिवस रेल्वे स्टेशनवर त्यांची नजर एका माणसावर पडली, जो आपल्या दोन पत्नींसह सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच बसला होता. बोलताना कळले की, तो काही साधा माणूस नव्हता, तर ऑल इंडिया रेडिओवर संगीत देणारे रोशन होते. त्यांनी सांगितले की, लव मॅरेज केल्यामुळे त्यांची नोकरी गेली. आता कमाईचा काही मार्ग नव्हता आणि राहण्याची जागाही नव्हती.

एका माणसाने दिली खास ऑफर

चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणे रोशन यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. सुरुवातीला त्यांचे संगीत ऐकून काही लोकांनी असे म्हटले होते की हे चित्रपटांसाठी योग्य नाही. इतकेच नाही तर, काही वितरकांनी केदार शर्मा यांच्यावर दबाव आणला की त्यांनी रोशन यांना चित्रपटातून बाहेर काढावे. त्या बदल्यात त्यांना महागड्या भेटवस्तूंपासून ते मोठ्या रकमेपर्यंतची ऑफर देण्यात आली. पण केदार शर्मा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी स्पष्ट सांगितले की रोशन यांना नक्कीच संधी मिळेल. त्यांचा विश्वास अखेर खरा ठरला.

काही काळानंतर रोशन यांनी ‘बरसात की रात’, ‘दिल ही तो है’, ‘ताजमहल’ आणि ‘ममता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये असे संगीत दिले की संपूर्ण देश त्यांच्या सुरांचा (चालींचा) वेडा झाला. त्यांच्याशी जोडलेला एक किस्सा असाही आहे की, आर्थिक चणचण आणि कौटुंबिक समस्यांमुळे ते इतके खचून गेले होते की त्यांनी आपले आयुष्य संपवण्याचा विचारही केला होता. पण अडचणींशी यशस्वीपणे लढत त्यांनी असे स्थान मिळवले की, आजही त्यांचे नाव हिंदी चित्रपट संगीतातील महान संगीतकारांमध्ये गणले जाते.

Follow Us
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक