Samantha वर आजही नाग चैतन्यचं प्रेम? हिरोसोबत पाहू शकला नाही रोमान्स, थेट थिएटरमधून पडला बाहेर

समंथासाठी 'कुशी' हा चित्रपट खूपच खास आहे. कारण या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने करिअरमध्ये काही काळ ब्रेक घेतला आहे. गेल्या वर्षी तिला मायोसिटीस या आजाराचं निदान झालं. त्याच्या उपचारासाठी आणि आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे.

Samantha वर आजही नाग चैतन्यचं प्रेम? हिरोसोबत पाहू शकला नाही रोमान्स, थेट थिएटरमधून पडला बाहेर
Samantha and Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 12:43 PM

हैदराबाद | 28 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांची जोडी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय मानली जायची. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. त्यानंतर समंथा तिच्या करिअरवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसतेय. तर दुसरीकडे नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत जोडलं जात आहे. यादरम्यान आता पुन्हा एकदा समंथा आणि नाग चैतन्यची सोशल मीडियावर चर्चा होतेय. यामागचं कारण म्हणजे समंथाचा आगामी चित्रपट ‘कुशी’ आहे.

नाग चैतन्यने नुकतीच एका चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. या स्क्रिनिंगला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतरही कलाकार उपस्थित होते. नाग चैतन्यने या चित्रपटाचा मध्यांतरापर्यंतचा भाग पाहिला. मात्र इंटरवलदरम्यान जेव्हा समंथाच्या आगामी ‘कुशी’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला, तेव्हा तो थेट थिएटरमधून बाहेर पडला. ‘कुशी’ या चित्रपटात समंथाने अभिनेता विजय देवरकोंडासोबत काम केलं आहे. यामध्ये दोघांचे बरेच रोमँटिक सीन्स आहेत. आपल्या पूर्वी पत्नीचे दुसऱ्या हिरोसोबत रोमँटिक सीन्स पाहू न शकल्याने नाग चैतन्यने थिएटरमधून काढता पाय घेतला, अशी चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

समंथासाठी ‘कुशी’ हा चित्रपट खूपच खास आहे. कारण या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने करिअरमध्ये काही काळ ब्रेक घेतला आहे. गेल्या वर्षी तिला मायोसिटीस या आजाराचं निदान झालं. त्याच्या उपचारासाठी आणि आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. मायोसिटीस या आजारामुळे समंथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. उपचारानंतर जेव्हा जेव्हा ती माध्यमांसमोर किंवा कॅमेरासमोर आली, तेव्हा हा परिणाम तिच्या चेहऱ्यावर अनेकदा पहायला मिळाला. आता जवळपास वर्षभर ती कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नसून फक्त तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. यासाठी तिने आगामी चित्रपटांसाठी घेतलेली ॲडव्हान्स रक्कमसुद्धा निर्मात्यांना परत केल्याचं समजतंय.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.