बॉलीवुडमधून मोठी बातमी, ड्रग्जचा डेटा मिळाला?

या सगळ्या सिताऱ्यांच्या चौकशीत जे काही एनसीबीनं जप्त केलेलं होतं त्याची तपासणी गांधीनगरच्या एफएसएलमध्ये करण्यात आली. | NCB drug racket case

बॉलीवुडमधून मोठी बातमी, ड्रग्जचा डेटा मिळाला?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 10:21 AM

मुंबई: बॉलीवुडचं ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) उघड करण्यासाठी एनसीबीला (NCB) मोठं यश मिळण्याची चिन्हं आहेत. कारण शंभरपेक्षा जास्त गॅजेटसमधून डेटा हस्तगत करण्यात एनसीबीला यश आलंय. यात दिपिका पादूकोण, अर्जून रामपाल, सारा अली खान, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर अशांच्या मोबाईल आणि इतर गॅजेटसचा समावेश आहे. (bollywood drug racket case NCB found new information from mobile phones)

या सगळ्या सिताऱ्यांच्या चौकशीत जे काही एनसीबीनं जप्त केलेलं होतं त्याची तपासणी गांधीनगरच्या एफएसएलमध्ये करण्यात आली. त्यात जवळपास पाचशे एचडी मुव्ही इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा मिळवण्यात यश आलंय.

यामुळे आता कोणता ड्रग्ज पेडलर, कोणत्या अभिनेत्याच्या किंवा हिरोईनच्या संपर्कात होता तेही उघड होईल. तसच अनेक कलाकारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जातेय. करण जोहरवर एनसीबीनं मोर्चा वळवल्यामुळे अगोदरच बॉलीवुडमध्ये खळबळ उडालीय. त्यात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा रिकव्हर करण्यात यश आल्यामुळे आणखी काही धागेदोरे एनसीबीला मिळणार आहेत.

एनसीबीची करण जोहरला नोटीस

करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत कलाकारांनी ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोलाकडे (NCB) तक्रार केली होती. याप्रकरणी एनसीबीने सप्टेंबरमध्ये करण जोहरला नोटीस बजावली होती.

करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसून आले होते. या पार्टीमध्ये सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता.

करण जोहरने एनसीबीला काय उत्तर दिले?

या नोटीसनंतर करण जोहरने एनसीबीला उत्तर दिले होते. सोशल मीडियावर कलाकारांचा पार्टीतला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडीओ ज्या मोबाईलने काढला होता तो व्हिडीओ हरवला आहे, अशी माहिती करण जोहरने एनसीबीला दिली.

संबंधित बातम्या:

कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा खळबळजनक दावा

करण जोहरचं प्रकरण, फडणवीस का काँग्रेस नेत्याच्या निशाण्यावर?

(bollywood drug racket case NCB found new information from mobile phones)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.