Photo : रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, रुपाली भोसलेची पावसात धमाल

‘आई कुठे काय करते‘ मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेचा पावसाळा हा आवडता ऋतू आहे. (Actress Rupali Bhosale's fun in rain)

1/6
Aai Kuthe kay karate
पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा हा किमयागार प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karate) मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखील पावसाळा हा आवडता ऋतू आहे.
2/6
Aai Kuthe kay karate
महत्त्वाचं म्हणजे पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली भोसले सोडत नाही.
3/6
Aai Kuthe kay karate
दरवर्षी मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन पावसात मनसोक्त भिजणं, मक्याचं कणीस आणि आईस्क्रीम खाणं हा तिचा ठरलेला नेम असतो. सध्या लॉकडाऊनमुळे हे करणं किंवा हा आनंद घेणं शक्य नाहीये.
4/6
Aai Kuthe kay karate
मात्र मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासामध्ये सुरु असल्यामुळे सेटवरच तिनं पावसाचा आनंद घेतला आहे. मस्त पावसात भिजण्याचा आनंद तिनं लुटला आहे.
5/6
Aai Kuthe kay karate
रुपाली सांगले, ‘मी विरारला रहाते. माझ्या बाल्कनीत तर मी छोटीशी बागच तयार केलीय. पावसाळ्यात तर इथला नजारा मन प्रसन्न करुन टाकणारा असतो. याच दरम्यान मोगऱ्याला बहर येतो. घरभर पसरणारा मोगऱ्याचा सुवास मन मोहित करुन टाकतो.’
6/6
Aai Kuthe kay karate
ती पुढे म्हणजे ‘यंदा तर माझ्या आईनं काकडीची वेलही लावली आहे. त्यामुळे घरगुती काकडीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. विरारला राहात असल्यामुळे डोंगर, हिरवळ हे अनुभवता येतं. पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, डोंगराच्या कुशीतून मनसोक्त उधळणारे धबधबे हे मला खूप आवडतं. त्यामुळे पाऊस माझ्या खूप जवळचा आहे.’