AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..; निवडणूक रॅलीदरम्यान पवन कल्याणचं वक्तव्य

साऊथ सुपरस्टार पवन कल्याणचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. निवडणुकीच्या रॅलीदरम्यान त्याने अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख केला. मला शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती, असं त्याने म्हटलंय. एका जाहिरातीची ऑफर पवन कल्याणला देण्यात आली होती.

मला शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..; निवडणूक रॅलीदरम्यान पवन कल्याणचं वक्तव्य
Shah Rukh Khan and Pawan KalyanImage Credit source: Instagram
Updated on: May 08, 2024 | 10:09 AM
Share

जनसेनाचे संस्थापक आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण सध्या चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तो आंध्रप्रदेशमध्ये प्रचार करत आहे. नुकत्याच एका रॅलीदरम्यान त्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख केला. यामुळे पवन कल्याणचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. “पैशांसाठी मी कधीच माझ्या मूल्यांशी तडजोड करत नाही”, असं तो म्हणाला. एका जाहिरातीसाठी शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला मिळाली होती, मात्र जनहिताचा विचार करून मी ती नाकारली, असा खुलासा पवन कल्याणने रॅलीमध्ये केला.

पवन कल्याण या रॅलीदरम्यान म्हणाला की, 2000 मध्ये त्याला समजलं की एक सॉफ्ट ड्रिंक लोकांच्या आरोग्यासाठी ठीक नाही. या सॉफ्ट ड्रिंकमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे समजताच त्याची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला. “कोला ब्रँडने मला त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र मी त्यात जराही रस दाखवला नाही. मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मिळाली होती. पण मी माझ्या सिद्धांतांना प्राधान्य दिलं. अशा पद्धतीने पैसे कमावण्यात मला अजिबात रस नाही”, असं तो पुढे म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan)

पवन कल्याणचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. 2008 मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये त्याने जनसेना पार्टीची स्थापना केली. पवन कल्याण हा मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ आहे. भावाच्या पक्षासाठी चिरंजीवी यांनीसुद्धा जनतेला आवाहन केलं आहे. नुकताच त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते त्यांच्या छोट्या भावाला मत देण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. “माझा छोटा भाऊ लोकांच्या सेवेसाठी आपल्या पैशांचा वापर करत आहे. त्याच्यावर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या”, असं ते म्हणाले. दुसरीकडे अभिनेता नानी यानेसुद्धा एक पोस्ट लिहित पवन कल्याणला समर्थन दर्शविलं आहे.

2008 मध्ये पवन कल्याणने भाऊ चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. परंतु हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर त्याने तो पक्ष सोडला. मार्च 2014 मध्ये पवन कल्याणने जनसेना पक्षाची स्थापना केली. त्यावेळी हा पक्ष गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला होता.

उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्...
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्....