AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला म्हणतात नशीब, मामासोबत शूटिंग बघायला गेली अन् मिळाली मोठी ऑफर, पण आयुष्यभर ही अभिनेत्री राहिली सिंगल

मामासोबत शूटिंग बघायला गेली आणि तेथील दिग्दर्शकाची नजर तिच्यावर पडली. दिग्दर्शकाने थेट या अभिनेत्रीला दिली होती चित्रपटात काम करण्याची ऑफर. पण आयुष्यभर राहिली सिंगल. कोण आहे ही अभिनेत्री?

| Updated on: Jun 15, 2026 | 11:47 AM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुरैय्या यांचा जन्म 15 जून 1929 रोजी लाहोर येथे झाला. त्या केवळ एक वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटसृष्टीचे वातावरण लाभले आणि त्यांनी ऑल इंडिया रेडिओच्या बालकार्यक्रमांतून गायनाची सुरुवात केली.

1 / 5
सुरैय्यांच्या आयुष्यातील मोठे वळण तेव्हा आले, जेव्हा त्या आपल्या मामांसोबत ताजमहल चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शक नानुभाई वकील यांनी त्यांचे साधे, निरागस व्यक्तिमत्त्व पाहून त्यांना चित्रपटात भूमिका दिली. याच क्षणापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली.

2 / 5
अभिनयासोबतच सुरैय्या यांनी गायिका म्हणूनही मोठी ओळख निर्माण केली. प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांनी त्यांच्या आवाजातील गोडवा ओळखून त्यांना गाण्याची संधी दिली. 'दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है', 'तू मेरा चांद मैं तेरी चांदनी', 'वो पास रहे या दूर' यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

3 / 5
सुरैय्या यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या काळात त्यांची लोकप्रियता इतकी मोठी होती की त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात होत्या.

सुरैय्या यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या काळात त्यांची लोकप्रियता इतकी मोठी होती की त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात होत्या.

4 / 5
त्यांची जोडी अभिनेता देव आनंद यांच्यासोबत विशेष लोकप्रिय ठरली. चित्रपटातील ही जोडी वास्तविक आयुष्यातही प्रेमात पडली होती. मात्र कौटुंबिक आणि धार्मिक कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. ही प्रेमकथा आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चित अपूर्ण प्रेमकथांपैकी एक मानली जाते.

5 / 5
Follow Us
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
Rohit Pawar Protest | रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 जुलैला पुन्हा रणशिंग
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
Solapur | काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?