राहुल वैद्य-दिशा परमारच्या लग्नाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी घेणार सात फेरे!

‘बिग बॉस 14’ फेम राहुल वैद्यने (Rahul Vaidya) अखेर आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तो त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. राहुल वैद्य याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

राहुल वैद्य-दिशा परमारच्या लग्नाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी घेणार सात फेरे!
राहुल-दिशा

मुंबई : ‘बिग बॉस 14’ फेम राहुल वैद्यने (Rahul Vaidya) अखेर आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तो त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. राहुल वैद्य याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. ज्यानंतर राहुल आणि दिशा यांचे चाहते खूप आनंदित झाले आहेत. त्यांचे सगळेच चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत (Rahul Vaidya And Disha Parmar Weeding date announcement).

राहुल आणि दिशा 16 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. राहुल याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्या परिवाराच्या आशीर्वादाने, हा खास क्षण तुमच्याबरोबर शेअर करण्यात आम्हाला आनंद होत आहे. आम्ही 16 जुलै 2021 रोजी लग्नगाठ बांधणार आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा आवश्यक आहेत. आम्ही एकत्र एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.’ ही पोस्ट शेअर करत राहुल याने लिहिले की, #TheDisHulWedding

पाहा राहुल वैद्य यांची पोस्ट

राहुल याच्या या पोस्टवर भाष्य करून अनेक सेलिब्रिटी त्यांचे अभिनंदन करत आहेत. राहुलसोबत ‘खतरों के खिलाडी 11’चा भाग बनलेल्या वरुण सूदने लिहिले, ‘वाह.. हॅपी.’ दुसरीकडे, दिव्यांका त्रिपाठी यांनी टिप्पणी केली, ‘राहुल शुभेच्छा.’

लग्नाबद्दल बोलताना राहुलने एका मुलाखतीत म्हटले आहे की, दिशा आणि मला नेहमीच काही लोकांच्या उपस्थितीत लग्न करायचे होते. आमच्या प्रियजनांनी आम्हाला या विशेष दिवशी आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा होती. हे विवाह वैदिक विधीनुसार होईल आणि सोहळ्यात गुरबानी शबद सेरेमनी देखील होणार आहे.

बिग बॉसमध्ये केला प्रपोज

गायक राहुल वैद्य यांने दिशा परमारला ‘बिग बॉस 14’च्या घरात, नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज केले होते. यानंतर दिशा परमार त्याला भेटायला आली होती आणि याचवेळी तिने राहुलचा प्रस्ताव देखील मान्य केला होता. दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दिशा परमारही राहुलच्या कुटुंबियांची खूप लाडकी आहे. ‘आम्हाला लग्न करायचे आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता इतक्यात मुहूर्त शोधणं योग्य नाही. त्यामुळे आम्ही वाट बघू’, असे राहुलने म्हटले होते.

(Rahul Vaidya And Disha Parmar Weeding date announcement)

हेही वाचा :

Happy Birthday Ranveer Singh | ‘गली बॉय’ ते ‘बेफिक्रे’ रणवीर सिंहच्या धमाकेदार फिल्स, IMDBवर मिळालीय जबरदस्त रेटिंग!

नवऱ्यासोबत घटस्फोट, आता कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे मिनिषा लांबा? बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI