PHOTO | अविरत मनोरंजनाचा घेतलाय वसा, मालिकांच्या शूटिंगसाठी कलाकार निघाले गोवा-सिल्वासा!

Harshada Bhirvandekar

| Edited By: |

Updated on: Apr 23, 2021 | 9:28 AM

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचं चित्रिकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होतं. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. याचा पुन्हा फटका बसू नये, म्हणून मालिकांचं शूट थेट दुसऱ्या राज्यात केलं जात आहे.

Apr 23, 2021 | 9:28 AM
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कठोर निर्बंध (Maharashtra Lockdown) लादले आहेत. या काळात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी सर्वच टीव्ही वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे.

1 / 7
प्रेक्षकांसोबतचे ऋणानुबंध जपत, या कठीण काळात सुद्धा मनोरंजन करण्याचं वचन ‘झी मराठी’ आपल्या प्रेक्षकांना देत आहे.देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. अशावेळी लॉकडाऊनमध्ये घरात असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सज्ज आहे.

2 / 7
सगळीकडे फक्त संचारबंदीच्याच बातम्या सुरु आहेत, या सर्व नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झी मराठी तुमच्या सोबत असणार आहे. कारण आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत.

3 / 7
देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे. वाहिनीवरील मालिकांचं चित्रिकरण आता बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर याठिकाणी होणार आहे. झी मराठीवरील कोणत्या मालिकांचे चित्रीकरण कुठे होणार पाहूया!

4 / 7
‘पाहिले ना मी तुला’ – गोवा, ‘अग्गंबाई सूनबाई’ – गोवा, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ – दमण, ‘माझा होशील ना’ – सिल्व्हासा, ‘देवमाणूस’ – बेळगाव, ‘चला हवा येऊ द्या’ – जयपूर

5 / 7
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचं चित्रिकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होतं. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. याचा पुन्हा फटका बसू नये, यासाठी दरम्यानच्या काळातच अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करुन ठेवली होती.

6 / 7
सध्या महाराष्ट्रातील चित्रिकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी आपलं बस्तान राज्याबाहेर हलवलं आहे. मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला, तरी अखंड मनोरंजनाची हमी देण्यासाठी अनेक वाहिन्यांनी पोटाला चिमटा काढत तो स्वीकारला आहे.

7 / 7

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI