AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड कलाकारांनी जे कधीच केलं नाही, ते विजय देवरकोडाने करून दाखवलं, अख्खं गाव नाही तर इंडस्ट्री करतेय कौतुक

सुपरस्टार असावा तर असा. जे इतक्या दिवस बॉलिवूडमधील कोणत्याच कलाकाराने केलं नाही तर लग्नानंतर विजय देवरकोंडाने करून दाखवलं. प्रत्येक जण करतोय कौतुक.

| Updated on: Mar 03, 2026 | 11:50 AM
Share
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या लग्नामुळेच नाही तर सामाजिक कार्यामुळेही चर्चेत आहेत. उदयपूर येथे थाटामाटात विवाह केल्यानंतर या जोडीने तेलंगणामध्ये आपल्या उदार मनामुळे सर्वांची मने जिंकली आहेत.

1 / 6
लग्नानंतर काही दिवसांतच विजय आणि रश्मिका हे विजयच्या गावात म्हणजेच तेलंगणातील नगरकुरनूल जिल्ह्यातील अंचमपेट गावात पोहोचले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना विजय देवरकोंडाने एक मोठी घोषणा केली ज्यामुळे संपूर्ण गाव आनंदित झाले.

2 / 6
विजयने त्याच्या ‘देवरकोंडा चॅरिटेबल ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत परिसरातील 44 सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः इयत्ता 9वी आणि 10 वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा त्याने केली.

3 / 6
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये आणि ते आत्मविश्वासाने पुढे जावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सोशल मीडियावर विजय देवरकोंडाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात तो आपल्या मातृभाषा तेलुगूमध्ये गावकऱ्यांना संबोधित करताना दिसत आहेत.

4 / 6
आपल्या गावी आणि तेथील विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी त्याने यावेळी व्यक्त केली. बोर्ड परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा थेट फायदा होणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. याच वर्षापासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

5 / 6
हा क्षण अत्यंत भावूक करणारा ठरला. मुलगा इतके मोठे सामाजिक कार्य करताना पाहून विजयच्या आई माधवी यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले. तसेच पत्नी रश्मिका मंदाना आणि भाऊ आनंद देवरकोंडा यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. गावकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले.

6 / 6
Follow Us
मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळेना; बच्चू कडूंचा इशारा
मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळेना; बच्चू कडूंचा इशारा.
माणसं चालतात की जनावरं? नांदेडच्या रस्त्यांवर कैलास खेर यांची नाराजी
माणसं चालतात की जनावरं? नांदेडच्या रस्त्यांवर कैलास खेर यांची नाराजी.
धुलीवंदनानिमित्त पुणे मार्केट यार्ड आज बंद
धुलीवंदनानिमित्त पुणे मार्केट यार्ड आज बंद.
आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक राजवाडी होळी संपन्न
आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक राजवाडी होळी संपन्न.
नागपुरात धुळवडनिमित्त मटन-चिकनच्या दुकानांसमोर रांगा
नागपुरात धुळवडनिमित्त मटन-चिकनच्या दुकानांसमोर रांगा.
इराण-इस्रायल युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर महागण्याची भीती
इराण-इस्रायल युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर महागण्याची भीती.
'समोर ये, धमक्या देऊ नकोस' जरांगेंचे गोविद फड यांना प्रत्युत्तर
'समोर ये, धमक्या देऊ नकोस' जरांगेंचे गोविद फड यांना प्रत्युत्तर.
दुबईत अडकलेल्या भारतीयांची घरवापसी! सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
दुबईत अडकलेल्या भारतीयांची घरवापसी! सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव.
शरणागती पत्करा, नाहीतर... ; ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
शरणागती पत्करा, नाहीतर... ; ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! काय आहे आजचे दर?
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! काय आहे आजचे दर?.