तेच डोळ तीच स्माईल… हुबेहूब सलमान खान याच्यासारखा दिसणाऱ्या तरुणाची सर्वत्र चर्चा… Video पाहून म्हणाल…
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता अभिनेता सलमान खान याच्या सारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्याला पाहिल्यानंतर भाईजानचे चाहते देखील अवाक् झाले आहेत...

आता सोशल मीडियामुळे सर्वकाही सहज सोपं झालं आहे. सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये अधिक व्हिडीओ तर सेलिब्रिटींचे असतात. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कोणत्या सेलिब्रिटीचा नाही तर, हुबेहूब अभिनेता सलमान खान सारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील काही वेळ गोंधळून जाल की, व्हिडीओत दिसणार खरंच सलमान खान तर नाही… सलमान खानसारखा दिसणारा तरुणाने काळा टी-शर्ट आणि लाल मफलर घेतला आहे. तरुण सलमान खान याच्या “गर्व” सिनेमातील “हम तुमको निगाहों में” या गाण्यावर लिप-सिंक करत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पूर्णपणे सलमान खान याच्या सारखे आहेत.
व्हिडीओत दिसणारा हुबेहूब सलमान खान याच्यासारखा दिसत असल्याने सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे. व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 2 लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. तर व्हिडीओला आतापर्यंत 60 लाख व्ह्यूज आले आहेत. तर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
हुबेहूब सलमान खान याच्यासारख्या दिसणाऱ्या एका युजरने लिहिलं की, ‘सलमान खान याच्या आत्याचा लहान मुलगा आहे.’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘सेम टू सेम सलमान खान…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ’90 च्या दशकातील सलमान खान दिसत आहे…’, तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मला तर हा रवी किशन सारखा दिसत आहे…’ सध्या सर्वत्र सलमान खान सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची चर्चा रंगली आहे.
सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 27 डिसेंबर रोजी अभिनेत्याचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. टीझरमध्ये सलमानचा शक्तिशाली लष्करी लूक दिसत होता, पण चीनशी झालेल्या संघर्षाच्या एका दृश्यात त्याच्या हावभावांमुळे त्याला खूप ट्रोल केलं जात आहे.
सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना सांगायचं तर सिनेमा 17 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. अशात सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
