AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही दिवस मेकअप न केल्यास मिळतील आश्चर्यकारक फायदे, नैसर्गिक ग्लो येण्यासोबतच त्वचा होईल निरोगी

आजकाल मेकअप करणे हे कॉमन झाले आहे. कुठे बाहेर जाणे असो किंवा पार्टीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असो मेकअप हा केला जातो. महिलांना मेकअप शिवाय अपूर्ण वाटते. मात्र नियमित मेकअप च्या वापरामुळे त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. पण काही दिवस मेकअप करणे थांबवल्यास त्वचेला अनेक प्रकारचे फायदे होतात.

काही दिवस मेकअप न केल्यास मिळतील आश्चर्यकारक फायदे, नैसर्गिक ग्लो येण्यासोबतच त्वचा होईल निरोगी
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 31, 2025 | 5:09 PM
Share

मेकअप आजकालच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी आणि स्वतःचा लुक वाढवण्यासाठी मेकअपचा वापर करतात. पण दररोज मेकअप केल्याने त्वचेवर खूप दबाव येतो आणि यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक हळूहळू कमी होत जाते. मेकअप पूर्णपणे न काढता झोपल्यास ते त्वचेसाठी अधिक हानिकारक ठरू शकते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही दिवस मेकअप पासून दूर राहून तुम्ही तुमच्या त्वचेला आराम तर देऊ शकतात. त्यासोबतच चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य ही परत मिळवू शकतात. मेकअप पासून ब्रेक घेतल्याने तुमच्या त्वचेला पुन्हा श्वास घेण्याची संधी मिळते आणि त्याचे फायदे ही अनेक होतात. जाणून घेऊ काही दिवस मेकअप न केल्यास चेहऱ्याला काय फायदे होतात? आणि यामुळे त्वचा आतून कशी निरोगी आणि चमकदार होते.

त्वचेला मिळते श्वास घेण्याची संधी

मेकअपच्या सतत वापरामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. त्यामुळे पिंपल्स आणि डाग येण्याची समस्या निर्माण होते. मेकअप मधून ब्रेक घेतल्याने त्वचेला श्वास घेण्याची संधी मिळते. ज्यामुळे त्वचा आतून निरोगी होते.

नैसर्गिक चमक वाढते

मेकअप शिवाय त्वचेवर जमा झालेली रसायने साफ होतात आणि नैसर्गिक चमक हळूहळू परत येते. त्वचेची आद्रता कायम राहून ती पूर्वीपेक्षा अधिक चमकदार दिसू लागते.

त्वचेची एलर्जी कमी होते

काही मेकअप उत्पादनांमध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेवर ऍलर्जी, लालसरपणा आणि खाज सुटू शकते. मेकअप पासून काही काळ दूर राहिल्यास या समस्या दूर होतात.

ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स ची समस्या कमी होते

मेकअपमुळे त्वचेवर तेल आणि घाण साचू शकते ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स तयार होतात. मेकअप मधून काही काळ ब्रेक घेतल्याने त्वचा स्वच्छ राहते आणि ही समस्या देखील कमी होते.

त्वचेचे नैसर्गिक तेल संतुलित राहते

मेकअप उत्पादने त्वचेच्या नैसर्गिक तेलांना हानी पोहोचवू शकता. ज्यामुळे त्वचा इतर खूप तेलकट किंवा कोरडी होते. मेकअप शिवाय त्वचा तेलाचे नैसर्गिक संतुलन राखते.

मुरूम आणि पुरळ कमी होतात

नियमित मेकअप केल्याने त्वचेचे नुकसान होते यामुळे मुरूम आणि पुरळ सारख्या समस्या निर्माण होतात. मेकअप पासून दूर राहून तुम्ही तुमची चेहऱ्यावर असलेले छिद्रे उघडे ठेवता. ज्यामुळे मुरूम आणि पुरळ यासारख्या समस्या निर्माण होत नाही.

वृद्धत्वाचा त्वचेवर होणारा परिणाम कमी होतो

मेकअपच्या सतत वापरामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारखी वृद्धत्वाची चिन्हे लवकर दिसू लागतात. मेकअप मधून ब्रेक घेऊन तुम्ही तुमच्या त्वचेला स्वतः दुरुस्त करण्याची संधी देता.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!