ट्रम्प यांना भेटण्याआधीच पुतिन यांनी वाट बदलली, थेट हुकूमशहाला फोन, पडद्यामागे काय घडतंय?
ट्रम्प आणि पुतिन हे दोघेही दोन बलाढ्य देशांचे प्रमुख आहेत. या भेटीमुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता सत्यात उतरली तर संपूर्ण जागाचा धोका टाळणार आहे. तसेच भारतावरही लादण्यात आलेला वाढीव टॅरिफ कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच आता रशियातून मोठी माहिती समोर येत आहे.

Vladimir Putin : येत्या 15 ऑगस्ट रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेतील अलास्का येथे भेट होणार आहे. ट्रम्प आणि पुतिन हे दोघेही दोन बलाढ्य देशांचे प्रमुख आहेत. या भेटीमुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता सत्यात उतरली तर संपूर्ण जागाचा धोका टाळणार आहे. तसेच भारतावरही लादण्यात आलेला वाढीव टॅरिफ कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच आता रशियातून मोठी माहिती समोर येत आहे. ट्रम्प यांच्यासोबत भेट होण्याआधीच पुतिन यांनी उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग ऊन यांच्याशी बातचित केली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन आणि व्लादीमीर पुतिन यांच्यात फोन कॉलच्या माध्यमातून चर्चा झाली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी पुतिन आणि ट्रम्प यांच्यात भेट होणार आहे. या भेटीआधीच पुतिन आणि किम जोंग ऊन यांच्यात ही चर्चा झाल्याने तिला विशेष महत्त्व आले आहे. पुतिन यांनी स्वत: किम जोंग ऊन यांना फोन करून बातचित केली आहे.
12 ऑगस्ट रोजी दोन्ही नेत्यांत चर्चा
नॉर्थ कोरियाचे शासकीय माध्यम असलेल्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पुतिन यांनी किम जोंग ऊन यांना कॉल केला आणि अलास्का येथे होणाऱ्या शिखर संमेलनाच्या अगोदरच रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी एकमेकांना साथ देऊ असे सांगितले. या दोन्ही नेत्यांत 12 ऑगस्ट रोजी ही चर्चा झाली आहे. भविष्यातही आपण एकमेकांप्रतिचे सहकार्य आणखी मजबूत करू अशी इच्छाही पुतिन यांनी व्यक्त केल्याचे या माध्यमाने सांगितले आहे.
रसिया-उत्तर कोरियात सलोख्याचे संबंध
रशिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांत गेल्या कित्येक वर्षांपासून चांगले सलोख्याचे संबंध आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला मदत केलेली आहे. या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला काही शस्त्रात पुरवलेले आहेत. गेल्याच वर्षी या दोन्ही देशांत संरक्षणविषयक एक करार झाला होता. विशेष म्हणजे उत्तर कोरियाने रशियाला आपले काही सैनिकही दिले होते. युक्रेनविरोधातल्या युद्धात आमचे सैनिक रशियन सैनिकांसोबत अग्रभागी होते, असे उत्तर कोरियाने एप्रिल महिन्यातच सांगितलेले आहे.
ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीत काय होणार?
दरम्यान, आता ट्रम्प यांची भेट होण्याआधीच पुतिन यांनी वाट वाकडी करून उत्तर कोरियाच्या हुकुमशाहांना कॉल केल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. असे असताना अलास्काच्या बैठकीतून नेमकं काय समोर येणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.
