Explainer : ट्रम्प यांच्या सेकंड इनिंगचा कोणत्या देशांना फटका? कोणत्या मुद्द्यांमुळे टेन्शन वाढणार?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा चीन, इराण, रशिया आणि उत्तर कोरियासारख्या देशांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणामुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण होऊ शकतो. इराणवरील प्रतिबंध पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे, तर रशिया आणि यूक्रेनमधील संघर्षावर त्यांच्या भूमिकेचा परिणाम जाणवेल.

President Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत दिमाखदार सोहळ्यात अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. ते अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती बनले आहेत. तसेच राष्ट्रपतीपदाची त्यांची ही दुसरी टर्म आहे. या आधी 2016 ते 2020पर्यंत त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातील लोक उपस्थित होते. उद्योजक, सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. ट्रम्प यांची ही सेकंड इनिंग आहे. त्यांच्या या इनिंगचा कोणत्या कोणत्या देशाला फटका बसू शकतो, त्यावर टाकलेला हा प्रकाश.
चीन पहिला शिकार
ट्रम्प यांच्या इनिंगचा सर्वात पहिला शिकार चीन होणार आहे. तसे संकेतच त्यांनी त्यांच्या भाषणात केला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प फाईलींवर सही करत होते. तेव्हा ते मीडियाच्या प्रश्नांची उत्तरेही देत होते. जर चीनने (अमेरिका-टिकटॉक डील) मंजूरी नाही दिली तर आम्ही चीनवर टॅरिफ लावू शकतो. चीन आमच्यावर टॅरिफ लावतो आणि आम्ही त्यांच्यावर अत्यंत कमी टॅरिफ लावतो हे विसरू नका. या शिवाय मी खूप टॅरिफ लावला आहे. आम्ही शेकडो आणि अब्जो डॉलर कमावले, पण चीनने कधी 10 सेंटचीही भरपाई केलेली नाही. त्यांनी आम्हाला लुटलं आणि आम्ही काहीच करू शकलो नाही, असं ट्रम्प म्हणाले. चीनसोबत अमेरिकेचा व्यापार, प्राद्योगिक आणि तैवान आदी मुद्द्यांवर वाद होऊ शकतो.
ईराणवर प्रतिबंध?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018मध्ये इराण अणू करारातून अमेरिकेला बाजूला केलं होतं. त्यांच्यावर कठोर आर्थिक निर्बंध लावले होते. त्यामुळे पुन्हा राष्ट्रपती झाल्यावर आता ट्रम्प हे इराणवर प्रतिबंध लावू शकतात. इराणने अणू कार्यक्रम सुरूच ठेवला तर ट्रम्प कठोर निर्बंध लावल्याशिवाय राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
यूक्रेनबाबत काय?
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी रशियावर प्रतिबंध लावले होते. पण तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे यावेळी अमेरिका रशियासोबत थोडं नरमाईचं धोरण स्वीकारण्याची शक्यता आहे. रशिया- यूक्रेन संघर्ष सुरूच राहिला तर ट्रम्प आपल्या टीकाकारांना खूश करण्यासाठी रशियावर कठोर प्रतिबंध लावू शकतात. पण ते कोणत्या धोरणांना प्राधान्य देतात त्यावर सर्व अवलंबून आहे. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यावर त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली. रशिया आणि यूक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी आधीच राष्ट्रपती असतो तर या दोन देशांमध्ये युद्ध झालंच नसतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अणू चाचणी महागात पडणार
उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्यासोबत ट्रम्प यांनी वैयक्तिक रित्या चर्चा केली होती. पण त्यावेळी अमेरिकेचा उत्तर कोरियाशी कोणताही ठोस समझौता होऊ शकला नव्हता. जर उत्तर कोरिया अणू चाचणी आणि मिसाइल प्रक्षेपण सुरूच ठेवणार असेल तर ट्रम्प उत्तर कोरियावरही कडक निर्बंध लावतील असं सांगितलं जात आहे.
व्हेनेज्यूएलाचं भविष्य काय?
राष्ट्रपती असताना ट्रम्प यांनी व्हेनेज्यूएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सरकारवर कडक निर्बंध लावले होते. व्हेनेज्यूएलामध्ये लोकशाही आणि मानवाधिकाराच्या स्थितीवरून ट्रम्प प्रशासन अधिक कडक निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
क्यूबा का क्या होगा?
ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात ओबामा प्रशासनाची धोरणं उलटवली होती. त्यांनी क्यूबावर कडक निर्बंध लादले होते. आता दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यावर ट्रम्प पुन्हा एकदा क्यूबावर आपली वक्रीनजर ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रम्प हे क्यूबावर अजून कठोर निर्बंध लादतील असं सांगितलं जात आहे. क्यूबा सरकारमध्ये काही बदल झाला नाही तर हे निर्बंध लादले जाऊ शकतात.
अमेरिकेची धोरणं आणि जागतिक मानकांचे पालन करावे म्हणून इतर देशांवर दबाव आणण्याचा या निर्बंधांचा उद्देश असतो. डोनाल्ड ट्रंप पुन्हा अध्यक्ष झाले आहेत, त्यामुळे जगावर काय प्रभाव पडेल, हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. त्यात त्यांची परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरणे आणि जागतिक मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया यांचा समावेश असेलय. काही संभाव्य प्रभाव काय असतील हे पाहू…
परराष्ट्र धोरण आणि जागतिक तणाव : ट्रम्प यांचाचा ‘अमेरिका फर्स्ट’ दृष्टीकोण आंतरराष्ट्रीय सहकार्याला कमकुवत करू शकतो. यामुळे अमेरिकेच्या पारंपरिक सहयोगी देशांसोबतचे संबंध तणावग्रस्त होऊ शकतात. चीन, इराण आणि रशियासोबतच्या संबंधात अस्थिरता वाढू शकते, ज्यामुळे जागतिक तणाव आणि संघर्षाच्या शक्यता वाढू शकतात.
हवामान बदल आणि पर्यावरण धोरण : ट्रम्प प्रशासनाने आधीच पॅरिस हवामान करारातून अमेरिकेला बाहेर काढले होते. त्यांच्या पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर, हवामान बदलावर उपाय शोधण्यासाठी जागतिक प्रयत्न कमजोर होऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक परिणाम : ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे व्यापार युद्धे आणि टॅरिफमध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
महामारी आणि आरोग्य संकट : महामारी आणि आरोग्य संकटांच्या दरम्यान, ट्रम्प यांच्या प्रतिक्रिया यावर टीका झाली होती. भविष्यात कोणतीही नवीन महामारी आली, तर त्यांची प्रतिक्रिया जागतिक आरोग्यावर प्रभाव टाकू शकते.
संयुक्त राष्ट्र आणि बहुपक्षीय संस्था : ट्रम्पचे बहुपक्षीय संस्थांबद्दल शंकेचे दृष्टिकोन होते. त्यांच्या धोरणांमुळे संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका कमजोर होऊ शकते. तथापि, हे सर्व अंदाजावर आधारित आहे आणि प्रत्यक्ष प्रभाव त्यांच्या धोरणांच्या अंमलबजावणीवर आणि जागतिक नेत्यांसोबतच्या त्यांच्या संबंधांवर अवलंबून असेल.
भाषणातील मुद्दे…
WHO मधून बाहेर पडणार
ट्रम्प यांनी राष्ट्रपती झाल्यावर केलेल्या भाषणातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाहीर केल्या आहेत. त्यांनी त्यांचा मनसुबाही जाहीर केला आहे. त्यामुळे भविष्यातील गोष्टींचा अंदाज येत आहे. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार आहे. तशा कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे. जेव्हा मी येथे होतो, तेव्हा आम्ही WHO ला 500 दशलक्ष डॉलर दिले होते आणि मी हे थांबवले. 1.4 बिलियन लोक असलेल्या चीनने 39 मिलियन दिले. आम्ही 500 मिलियन देत होतो. हे मला थोडे अन्यायकारक वाटले, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ग्रीनलँड आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी हवी
ग्रीनलँडवर ताबा मिळण्याबाबतही ट्रम्प यांनी थेट भाष्य केलंय. ग्रीनलँड एक अद्भुत ठिकाण आहे आणि आम्हाला आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की डेनमार्कही यात सामील होईल. कारण ते राखण्यासाठी त्यांना खूप पैसा खर्च करावा लागतो. ग्रीनलँडचे लोक डेनमार्कसोबत खूश नाहीत. हे आमच्यासाठी नाही, तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे सर्वत्र रशियन आणि चिनी जहाजे आणि युद्धपोत आहेत, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
पॅरिस हवामान करार
अमेरिकेला ऐतिहासिक पॅरिस हवामानमधून काढण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांची ही घोषणा जगभरातील तापमानवाढीला नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना धक्का देईल आणि एकदा पुन्हा अमेरिका आपल्या सर्वात जवळच्या मित्रांपासून दूर जाईल.
अमेरिका सर्वात महान आणि शक्तिशाली होईल
अमेरिका पृथ्वीवरील सर्वात महान, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात सन्मानित राष्ट्र म्हणून आपले योग्य स्थान पुन्हा प्राप्त करेल. ज्यामुळे देशाला संपूर्ण जगातून प्रशंसा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक देश आमची ईर्ष्याही करेल आणि आम्ही कुणालाही आमचा फायदा उठवू देणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. ट्रंप यांनी स्थलांतर, शुल्क आणि ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकेच्या धोरणांना आक्रमकपणे बदलण्याचे वचन दिले.
मेक्सिकोची आखात आणि पनामा नहर
अमेरिके-मेक्सिको सीमेला राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती म्हणून घोषित करणे, मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून “अमेरिकेचे आखात” करणे आणि पनामा नहर परत मिळवणे आदी घोषणाही त्यांनी केल्या आहेत.