जगाची चिंता वाढवणाऱ्या सुएझ ब्लॉकप्रकरणी ‘या’ तरुणीवर आरोप, अखेर स्वतः समोर येऊन सत्य सांगितलं

इजिप्तची (Egypt) पहिली महिला शिप कॅप्टन मारवा सिलहेदर (Marwa Elselehdar) सध्या चर्चेत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 3:35 AM, 7 Apr 2021
जगाची चिंता वाढवणाऱ्या सुएझ ब्लॉकप्रकरणी 'या' तरुणीवर आरोप, अखेर स्वतः समोर येऊन सत्य सांगितलं

Marwa Elselehdar Falsely Blamed For Suez Canal Crisis कैरो : इजिप्तची (Egypt) पहिली महिला शिप कॅप्टन मारवा सिलहेदर (Marwa Elselehdar) सध्या चर्चेत आहे. कारण सुएझ कालव्यात जहाज अडकण्यासाठी तिच जबाबदार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. जगाची आर्थिक कोंडी करणाऱ्या सुएझ कालव्यातील ब्लॉकला (Suez Canal Blockage) जेव्हा तिलाच जबाबदार धरण्यात आलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. मात्र, नंतर हे एका फेक न्यूज कँपेन अंतर्गत पसरवण्याचं काम सुरु असल्याचं समोर आलं. त्यानंतर तिने स्वतः माध्यमांशी बोलताना सत्य सांगितलं. 29 वर्षीय मारवा सिलहेदरने स्वतः याबाबत खुलासा केल्यानंतर या फेक न्यूजचा पर्दाफाश झालाय (False allegations on Marwa Elselehdar For Suez Canal Crisis in Egypt).

इजिप्तची पहिली महिला जहाज कॅप्टन मारवावर गंभीर आरोप

मागील महिन्यात युरोप आणि आशिया खंडातील जागतिक व्यापाराचा प्रमुख मार्ग असलेल्या सुएझ कालव्यात एक महाकाय जहाज अडकलं. तब्बल आठवडाभरानंतर ते काढण्यात यश आलं. त्यामुळे अब्जावधींचं नुकसान झालं. याला एक इजिप्तची पहिली महिला कॅप्टन मारवा जबाबदार असल्याचं पसरवण्यात आलं. मात्र, या सुएझ कालवा ब्लॉकेजच्या घडामोडी झाल्या तेव्ही ती स्वतः एका वेगळ्या जहाजावर एलेक्जेंड्रिया शहरात होती. त्यामुळे या प्रकरणात तिच्यावर खापर फोडण्याचा प्रकार पाहून तिने स्वतः पुढे येऊन आपली बाजू मांडलीय.

‘समाजात महिलांनी असं काम करणं मान्य नाही’

कॅप्टन मारवा म्हणाली, “मी व्यापारी सागरी वाहतुकीच्या क्षेत्रातील एक यशस्वी महिला असल्यानेच माझ्याविषयी खोट्या बातम्या पसवरण्यात आल्या असाव्यात असं मला वाटतं. किंवा मी इजिप्तमधून आहे त्यामुळेही माझ्यावर आरोप करण्यात आले असावेत. मला या आरोपांचा निश्चित उद्देश सांगता येणार नाही. आपल्यासमाजात आजही एखादी मुलगी आपल्या कुटुंबापासून कोसो दूर लांब समुद्रात राहून काम करु शकते हे समाजासा मान्य नाहीये.”

हेही वाचा :

Suez Canal Blocked : सुएझ कालवा ब्लॉकप्रकरणी भारतीय कर्मचारी अडचणीत, 25 जणांना अटक होणार?

Suez Canal : सुएझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज अखेर हटवलं!

Suez canal | सुएझ कालव्यातील जहाज काही निघेना; नेटकरी म्हणतात बाहुबलीला बोलवा, भन्नाट मीम्स व्हायरल

व्हिडीओ पाहा :

False allegations on Marwa Elselehdar For Suez Canal Crisis in Egypt