AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पाकिस्तानचं काही खरं नाही! इस्रायलची खतरनाक मिसाईल भारताच्या ताफ्यात सामील होणार

आगामी काळात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी एक खतरनाक मिसाईल जोडली जाणार आहे. ही मिसाईल भारतातून कराची आणि रावळपिंडीवर हल्ला करू शकते.

आता पाकिस्तानचं काही खरं नाही! इस्रायलची खतरनाक मिसाईल भारताच्या ताफ्यात सामील होणार
india israel missile
| Updated on: Jul 01, 2025 | 4:08 PM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदी झाली असली तर इस्रायलकडून युद्धाची तयारी सुरु आहे. त्याबरोबर भारतही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. आगामी काळात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी एक खतरनाक मिसाईल जोडली जाणार आहे. ही मिसाईल भारतातून कराची आणि रावळपिंडीवर हल्ला करू शकते. यासाठी भारत इस्रायलसोबत मोठा करार करण्याची शक्यता आहे.

लोरा मिसाईल

लोरा मिसाईल इस्रायली संरक्षण कंपनी IAI ने विकसित केलेली आहे. या मिसाईलचा सुपरसॉनिक वेग आणि 400 किलोमीटरवर हल्ला करण्याची क्षमता तिला वेगळे बनवते. ही मिसाईल जमीन आणि समुद्र अशा दोन्ही ठिकाणांवरून प्रक्षेपित करता येते. त्यामुळे पाकिस्तानचा काटा काढण्यासाठी भारत मोठ्या संख्येने इस्रायली LORA मिसाईल खरेदी करु शकतो.

भारत आणि इस्रायलमधील संरक्षण क्षेत्रातील व्यापार गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रायली हॅरोप आणि हार्पी ड्रोन तसेच रॅम्पेज मिसाईलचा वापर करण्यात आला होता. भारताने आता इस्रायलकडून एअर लोरा क्षेपणास्त्र खरेदी करण्याची योजना आखली आहे. लोरा मिसाईलची खरेदी केल्यास पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

लोरा मिसाईलचे वैशिष्ट्ये

  • लोरा मिसाईलची रेंज 400 किलोमीटर आहे, याचे वजन 1600 किलो आहे.
  • लोरा मिसाईल ही अचूक लक्ष्य साधते. शत्रूचा कोणताही जॅमर हे मिसाईल पकडू शकत नाही.
  • लोरा मिसाईल शत्रूने बंकर किंवा जमिनीत महत्त्वाचे शस्त्र लपवले असेल तर ते ही मिसाईल नष्ट करू शकते.
  • ही मिसाईल Su-30 MKI लढाऊ विमानात जोडली जाऊ शकते.
  • एअर लोरा Su-30 MKI लढाऊ विमानांसह भारतात राहून पाकिस्तानच्या चार शहरांना उडवू शकते.

लोरा मिसाईलची किंमत किती?

लोरा मिसाईलची अधिकृत किंमत जाहीर झालेली नाही, मात्र फोर्ब्सच्या अहवालानुसार, एअर लोराची किंमत भारतीय रुपयांमध्ये 8 कोटी रुपये असू शकते. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची किंमत 34 कोटी रुपये आहे, म्हणजे लोराची किंमत ब्रह्मोसच्या एक चतुर्थांश आहे. तर अग्नि 5 ची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे, म्हणजेच लोरा मिसाईल हे इतर मिसाईल पेक्षा स्वस्त आहे.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...