पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर, इम्रान सरकारचा कर्जाचा नवा रेकॉर्ड

पाकिस्तानची इतकी दुर्दशा कधीही झाली नव्हती, जितकी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या एका वर्षात झाली. आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानमध्ये सत्ताधारी इम्रान खान सरकारने आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात आर्थिक कर्ज घेण्याचा नवा विक्रम केला आहे. एका वर्षात पाकिस्तान सरकारच्या कर्जाच्या रकमेत एकूण 7509 अरब रुपयांची वाढ झाली

पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर, इम्रान सरकारचा कर्जाचा नवा रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Oct 09, 2019 | 9:28 AM

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती संपूर्ण जगाला माहीत आहे (Pakistan Economic bankruptcy). पाकिस्तानची इतकी दुर्दशा कधीही झाली नव्हती, जितकी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या एका वर्षात झाली (Pakistan Economy). आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानमध्ये सत्ताधारी इम्रान खान सरकारने आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात विक्रमी कर्ज घेतलं आहे (Imran govt financial loan record).

अधिकृत माहितीच्या आधारे, इम्रान सरकारने एका वर्षाच्या कार्यकाळात देशातील कर्जाच्या रकमेत एकूण 7509 अरब रुपयांची वाढ झाली आहे (Imran govt financial loan record). पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, कर्जाचे हे आकडे पाकिस्तानी स्टेट बँकेने पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहेत.

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 दरम्यान परदेशातून 2804 अरब रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. तर, घरघुती स्त्रोतांकडून 4705 अरब रुपयांचं कर्ज घेण्यात आलं.

कर्जात 1.43 टक्के वाढ

सूत्रांनुसार, स्टेट बँकेच्या आकड्यांनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या सार्वजनिक कर्जात 1.43 टक्क्यांची वाढ झाली. सरकाच्या कर्जात वाढ होऊन आता ते 32,240 अरब रुपये इतकं झालं आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये हे कर्ज 24,732 अरब रुपये होतं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरकारचा कर संग्रह 960 अरब रुपये इतका होता, जो एक ट्रिलियन रुपयांच्या लक्ष्यपेक्षा कमी होता, अशी माहिती पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भारताला जिहादी धमकी

इम्रान खान यांचं अमेरिकेतही काश्मीर प्रश्नाचं गाऱ्हाणं, डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थीसाठी तयार

पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून छळ, धुळ्याचा जवान चंदू चव्हाणचा राजीनामा

पाकिस्तानला दणका, निजामाची अब्जावधींची संपत्ती भारतात येणार

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.