Russia Ukraine War Live : आतापर्यंत तीस लाख लोकांनी सोडला युक्रेन

| Updated on: Mar 19, 2022 | 8:30 AM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : आतापर्यंत तीस लाख लोकांनी सोडला युक्रेन
Image Credit source: tv9 marathi

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाकडून युक्रेनच्या मोठ्या शहरांना लक्ष बनवण्यात येत आहे. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत लाखो युक्रेनियन नागरिकांनी आपला देश सोडला आहे. दरम्यान आता रशिया युक्रेनमध्ये रासायनिक युद्ध करू शकतो असा इशारा नाटोकडून देण्यात आला आहे. आम्हाला भीती वाटते की, रशिया युक्रेनविरोधात रासायनिक युद्धाला सुरुवात करू शकतो. तसे झाल्यास हे सर्वाधिक क्रूर युद्ध असेल, असे नाटोचे सेक्रेटरी जनरल जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटले  आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Mar 2022 02:21 PM (IST)

    आतापर्यंत तीस लाख लोकांनी सोडला युक्रेन

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आतापर्यंत युद्धाच्या भीतीपोटी तब्बल तीस लाख लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती युक्रेन प्रशासनातील एका उच्चपदस्त अधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आली आहे.

  • 16 Mar 2022 12:11 PM (IST)

    पुढील आठवड्यात जो बायडन युरोप दौऱ्यावर

    रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बायडन पुढील आठवड्यात युरोप दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते नाटोचे सदस्य असलेल्या देशांसोबत युक्रेन आणि रशिया युद्धाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 16 Mar 2022 10:12 AM (IST)

    युक्रेनमध्ये दोन पत्रकांरांचा मृत्यू

    युक्रेनमध्ये युद्धाचे वार्तांकन करत असलेल्या दोन पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. हे दोनही पत्रकार ‘फॉक्स न्यूज’  या वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. वार्तांकनादरम्यान त्यांच्या वाहनाला आग लागली. या आगीतच त्यांचा मृत्यू झाला आहे.. पियरे जकर्जवेस्की (55) आणि ऑलेक्जेंड्रा (20) अशी त्यांची नावे आहेत.

    .

  • 16 Mar 2022 08:47 AM (IST)

    रशियाने युक्रेनच्या पाचशे नागरिकांना बंदी बनवले

    रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच असून, युक्रेनच्या मारियुपोल भागातील जवळपास पाचशे नागरिकांना रशियाने बंदी बनवल्याची माहिती समोर येत आहे.

  • 16 Mar 2022 06:33 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियांच्या बेल्गोरोड, कुर्स्क मार्गे भारतात आणण्याचा प्रयत्न

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियाच्या बेल्गोरोड, कुर्स्क मार्गे  भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

Published On - Mar 16,2022 6:17 AM

Follow us
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.