Switzerland Family Suicide : पोलिस आल्याचे कळताच स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच कुटुंबाची सातव्या मजल्यावरुन उडी

पोलिस जेव्हा घरी गेले होते तेव्हा आतून कोण आहे अशी विचारणा झाली. त्यानंतर बाहेरुन आवाज आला पोलिस. पोलिस शब्द ऐकताच घरामध्ये शांतता पसरली. त्यानंतर पोलिसांनी बराच वेळ बेल वाजवूनही दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे पोलिस निघून गेले, अशी माहिती पोलिस प्रवक्ते अलेक्झांड्रे बिसेन्झ यांनी दिली.

Switzerland Family Suicide : पोलिस आल्याचे कळताच स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच कुटुंबाची सातव्या मजल्यावरुन उडी
स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच कुटुंबाची सातव्या मजल्यावरुन उडीImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 1:05 AM

स्वित्झर्लंड : पोलिसांच्या भीतीने एकाच कुटुंबातील पाच जणांनी राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी (Jumped) घेतली असून यापैकी चौघांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना स्वित्झर्लंडमध्ये उघडकीस आली आहे. तर यामध्ये 15 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होम स्कूलिंग प्रकरणी पोलिस या कुटुंबाच्या घरी अटक वॉरंट घेऊन गेले होते. पोलिस येताच भीतीपोटी कुटुंबातील सदस्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मृतांमध्ये कुटुंबातील पती-पत्नी, मुलगी आणि पत्नीच्या जुळ्या बहिणींचा समावेश आहे. तर मुलगा गंभीर जखमी आहे. (The French family jumped from the seventh floor in Switzerland after police arrived)

अटक वॉरंट घेऊन आले होते पोलिस

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सदर फ्रेंच कुटुंब स्वित्झर्लंडमधील Montreux च्या Lake Geneva परिसरात राहत होते. होम स्कूलिंग प्रकरणी स्वित्झर्लंड पोलिस गुरुवारी त्यांच्या अटक वॉरंट घेऊन पोहचले. पोलिसांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला मात्र कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलिस माघारी निघून गेले. त्यानंतर पोलिसांना या मृत्यूची बातमी कळली. मृतांमध्ये 40 वर्षीय पुरुष, त्याची 41 वर्षांची पत्नी आणि त्याच्या पत्नीच्या जुळ्या बहिणींचा समावेश आहे. याशिवाय त्या व्यक्तीच्या 8 वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या 15 वर्षाच्या मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस आल्याचे कळताच सर्वांनी बाल्कनीतून उड्या घेतल्या

पोलिस जेव्हा घरी गेले होते तेव्हा आतून कोण आहे अशी विचारणा झाली. त्यानंतर बाहेरुन आवाज आला पोलिस. पोलिस शब्द ऐकताच घरामध्ये शांतता पसरली. त्यानंतर पोलिसांनी बराच वेळ बेल वाजवूनही दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे पोलिस निघून गेले, अशी माहिती पोलिस प्रवक्ते अलेक्झांड्रे बिसेन्झ यांनी दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, अपार्टमेंटच्या बाल्कनीतून काही लोक पडले आहेत. जेव्हा पोलिस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना कळले की ज्या घरातून ते परत आले त्याच घरातील लोक पडले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेवेळी अपार्टमेंटमध्ये कुटुंबातील सदस्यांशिवाय दुसरे कोणीच नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. (The French family jumped from the seventh floor in Switzerland after police arrived)

इतर बातम्या

भारताचं ‘डिफेन्स फर्स्ट’: संरक्षण खर्चात जगात तिसरा, 5 लाख कोटींचं बजेट

Delhi High Court : ईडीलाही आरटीआय कायद्याच्या तरतुदी लागू; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.