AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखाद्या व्हायरसने तुमच्या श्वसनप्रणालीवर हल्ला केल्यानंतर काय होते?; कोरोनाच नव्हे तर अनेक विषाणू ठरतात मृत्यूचे कारण!

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे अनेक देशांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. करोडो लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामध्ये लाखो लोक मरण पावले. सुरूवातीच्या काळात कोरोनाचे कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नव्हती.

एखाद्या व्हायरसने तुमच्या श्वसनप्रणालीवर हल्ला केल्यानंतर काय होते?; कोरोनाच नव्हे तर अनेक विषाणू ठरतात मृत्यूचे कारण!
विषाणू
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 6:32 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे अनेक देशांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. करोडो लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामध्ये लाखो लोक मरण पावले. सुरूवातीच्या काळात कोरोनाचे कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नव्हती. आता कोणत्याही व्हायरसचे नाव ऐकले तरी देखील मनात धडकी बसते. (Not only corona but many viruses cause death know about human respiratory system)

श्वसन प्रणालीवर परिणाम करणारे इतर अनेक विषाणू देखील आहेत, जसे की इन्फ्लुएन्झा-ए (IAV) आणि रेस्पिरेटरी सिन्सिटिक व्हायरस (RAC), ज्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. इन्फ्लुएन्झा आणि Sars Cov-2 वगळता यापैकी कोणत्याही विषाणूसाठी कोणतीही लस किंवा प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत.

रिसर्च स्टडीमध्ये नेमके काय आहे?

ग्लासगो विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एका संशोधन अभ्यासात स्पष्ट केले आहे की, जेव्हा एकापेक्षा जास्त विषाणू एकाच वेळी मानवी शरीरावर हल्ला करतात तेव्हा काय होते आणि ते टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे. संशोधकांच्या मते, या स्थितीला ‘को-इन्फेक्शन’ म्हणतात.

संशोधनामध्ये म्हटंले आहे की संक्रमणाच्या 30 टक्के केसमध्ये एकापेक्षा जास्त व्हायरस कारणीभूत असू शकतात. याचा अर्थ असा की काही ठिकाणी दोन भिन्न विषाणू तुमच्या नाक किंवा फुफ्फुसांच्या पेशींना संक्रमित करत करतात. जेव्हा हे वेगवेगळे विषाणू एकाच पेशीमध्ये मिसळतात, तेव्हा विषाणूचे एक नवीन रूप दिसून येते आणि त्याला ‘अँटीजेनिक शिफ्ट’ म्हणतात.

2 व्हायरस संक्रमित झाल्यावर काय होते?

संशोधन अभ्यासात पेशींना IAV आणि RSV ची लागण झाली होती. संशोधकांना असे आढळले की, काही मानवी फुफ्फुसांच्या पेशी दोन्ही विषाणूंनी संक्रमित आहेत आणि पेशीमधून बाहेर पडलेल्या विषाणूमध्ये दोन्ही विषाणूंची वैशिष्ट्ये आहेत. काही नवीन फॉर्ममध्ये त्यांच्या पृष्ठभागावर दोन्ही विषाणूंची प्रथिने होती, तर काहींमध्ये दोन्हीसाठी समान जीन्स होते.

लसीसाठी अभ्यास आवश्यक पण सुरक्षितता देखील महत्वाची

लस आणि उपचारांच्या विकासासाठी सूक्ष्मजीवांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, त्यापेक्षाही सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. संशोधकांना मॉडेलद्वारे समजले की वास्तविक जगात काय होत आहे. संशोधक स्पष्टपणे सांगतात की कोणत्याही रोगाच्या प्रगतीचे अनेक टप्पे असतात. रोग कसे पसरतात, त्यांची कारणे, जीवाणू, विषाणू किंवा इतर रोग असतात. त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्याबद्दल अभ्यास केल्यावरच, उपचारांसाठी औषध किंवा प्रतिबंधासाठी लस तयार केली जाऊ शकते. पण सर्वप्रथम, सुरक्षा महत्वाची आहे.

संबंधित बातम्या : 

चावून खायचं की तसच गिळायचं? तुळशीच्या पानाचं नेमकं काय करायचं? वाचा सविस्तर

धक्कादायक! कोरोना काळात 4 ते 18 वयोगटातील 80% विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर घटला; वाचा सर्व्हे काय सांगतो?

तुम्हाला ताप आहे का? तुमचा ताप डेंग्यू किंवा इतर व्हायरल आहे हे कसे ओळखावे?, वाचा! 

(Not only corona but many viruses cause death know about human respiratory system)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.