AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super Blood Moon Explainer | आज आकाशात दोन चमत्‍कार अनुभवायला मिळणार, जाणून घ्या असं का आणि कधी होतं?

बुधवार 26 मे म्हणजेच आज एक अनोखी खगोलीय घटना घटणार आहे (Super Blood Moon And Lunar Eclipse ). वर्षातील सर्वात मोठा 'सुपर ब्लड मून' दिसणार आहे, तर पूर्ण चंद्रग्रहण देखील दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर होणार आहे.

Super Blood Moon Explainer | आज आकाशात दोन चमत्‍कार अनुभवायला मिळणार, जाणून घ्या असं का आणि कधी होतं?
super-blood-moon
| Updated on: May 26, 2021 | 1:11 PM
Share

मुंबई : बुधवार 26 मे म्हणजेच आज एक अनोखी खगोलीय घटना घटणार आहे (Super Blood Moon And Lunar Eclipse ). वर्षातील सर्वात मोठा ‘सुपर ब्लड मून’ दिसणार आहे, तर पूर्ण चंद्रग्रहण देखील दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर होणार आहे. चंद्रग्रहण फक्त थोड्या काळासाठी भारतात दिसेल आणि ते पूर्व भारतातील काही भागात तसेच पश्चिम बंगाल, ओदिशा आणि अंदमान-निकोबार बेटांच्या किनारपट्टीच्या भागातही पाहिले जाऊ शकते (Super Blood Moon And Lunar Eclipse Can Be Seen In India Know Everything About It).

आज लाल रंगाचा चंद्र दिसेल

ब्लड मून म्हणजे आज आपण लाल चंद्र पाहू शकता. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर या भागात हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. भारतीय वेळेनुसार आंशिक ग्रहण 3 वाजून 15 मिनिटांपासून सुरु होईल. पूर्ण चंद्रग्रहण 4 वाजून 39 मिनिटांनी सुरु होईल आणि सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी संपेल. त्याचबरोबर, आंशिक ग्रहण संध्याकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी संपेल.

अडीच वर्षानंतर येते ही संधी

26 मेची घटना एक अनोखी घटना मानली जाते. चंद्रग्रहणादरम्यान जगाच्या बर्‍याच भागात सुपर ब्लड मूनही दिसणे विशेष आहे. अशा परिस्थितीत चंद्रग्रहण लागेल आणि चंद्र लाल रंगाचा दिसेल. यूएस स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार, 26 मे रोजी संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीत जाईल. जेव्हा हे आपल्या ग्रहाच्या सावलीत नसते, तेव्हा तो पूर्वीपेक्षा मोठा आणि अधिक चमकदार दिसेल.

2021 सालचा हा दुसरा सुपर ब्लड मून आहे आणि 26 एप्रिल रोजी पहिला सुपर ब्लड मून पाहिला गेला. 26 मे रोजी होणार असलेल्या ब्लड मूनला वैज्ञानिक सर्वात मोठा सांगण्यात येत आहे. सुपरमून आणि पूर्ण चंद्रग्रहणाची घटना अडीच वर्षांतून एकदाच होते.

आपण सुमारे 14 ते 15 मिनिटांसाठी या आकाशीय घटनेचे साक्षी होऊ शकता. यावर्षी, चार सुपरमून पहायला मिळतील. आज जो सुपर ब्लड मून दिसमार आहे तो 15 टक्के अधिक चमकदार आणि 7 टक्के मोठा असेल. त्याला फ्लॉवर मूनदेखील म्हणतात. कारण, मे महिना हा काळ आहे जेव्हा अनेक फुले उमलतात आणि उत्तर ध्रुवामध्ये वसंत ऋतू असतो.

सुपरमून म्हणजे काय?

सुपरमून एक खगोलीय घटना आहे. ज्यादरम्यान चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, म्हणून तो मोठा आणि 14 टक्के अधिक उजळ दिसतो. त्याला पेरिगी मून देखील म्हणतात. चंद्राच्या किंवा इतर कोणत्याही उपग्रहाच्या सर्वात जवळच्या स्थानाला पेरगी असे म्हणतात आणि सर्वात दूरच्या स्थानास अपोगी असे म्हणतात. जेव्हा पृथ्वीपासून चंद्र 3,60,000 किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असेल तेव्हाच चंद्राला सुपर मून म्हणतात.

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की सुपर मूनचा परिणाम खूप वाईट असतो. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामी, पूर किंवा वाईट हवामान यासारख्या घटना घडतात. अद्याप हे सत्य सिद्ध झालेले नाही. चंद्राचा परिणाम समुद्राच्या लाटांवर निश्चितच होतो, फूलमून आणि न्यूमुनवेळी समुद्राच्या लाटा खवळलेल्या असतात. परंतु पेरीगीच्या परिस्थितीमध्येही यामध्ये सरासरी पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त फरक पडत नाही.

ब्लड मून म्हणजे काय?

जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीने व्यापलेला असतो, तेव्हा ब्लड मून असतो. परंतु काळा होण्याऐवजी तो लाल रंगाचा होतो. हेच एकमेव कारण आहे की पूर्ण चंद्रग्रहणाला कधीकधी ‘रेड ब्लड मून’ असे म्हणतात.

नासाने म्हटले की, “ग्रहण लागलेला चंद्र त्यावेळी जगभरात होणाऱ्या सर्व सूर्यास्त आणि सूर्योदयांचा शिल्लक लाल-नारंगी प्रकाशामुळे मंदपणे प्रकाशित होतो. ग्रहणादरम्यान पृथ्वीच्या वातावरणात जितकी अधिक धूळ किंवा ढग असतील, चंद्र तितकाच जास्त लाल दिसेल.”

नासाच्या मते, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर सूर्याचे किरण वळतात आणि पसरतात. लाल किंवा नारंगीपेक्षा निळा किंवा व्हायलेटचा रंग जास्त प्रमाणात पसरतो. म्हणून, आकाशाचा रंग निळा दिसतो. लाल रंग सरळ दिशेने सरकतो, म्हणून तो केवळ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळीच दिसतो.

सुपर ब्लड मूनचा वेळ काय?

26 मे रोजी, सुपर मून संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांच्या सुमारास असेल, जेव्हा पौर्णिमा पेरीगीवर असेल. पृथ्वी आणि सुपर मून मधील अंतर 3,57,309 किमी असेल. ज्यांना हे विलक्षण चंद्रग्रहण पहायचं असेल, ते दुर्बिणीद्वारे ते पाहू शकतात.

दिल्ली, मुंबई, चेन्नई दिसणार नाहीत

भारतातील बहुतेक भागांमध्ये बहुतेक ग्रहण काळात चंद्र पूर्व क्षितिजाखाली असेल आणि म्हणूनच देशातील लोकांना ब्लड मून पाहणे शक्य होणार नाही. परंतु काही भागांमध्ये, पूर्व भारतातील बहुतेक लोकांना केवळ अर्धवट चंद्रग्रहणाचा शेवटचा क्षण पाहता येईल. खगोलशास्त्रज्ञ देबीप्रसाद दुआरी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले आहे की, “देशातील बर्‍याच भागांमध्ये चंद्र पूर्व क्षितिजाच्या खाली असेल, त्यामुळे त्यांना ब्लड मून पाहता येणार नाही.” परंतु काही भागात लोकांना अर्धवट चंद्रग्रहणाची शेवटची काही क्षणं पाहायला मिळतील. ” दिल्ली, मुंबई, चेन्नईसह देशातील बर्‍याच भागात लोक ग्रहण पाहू शकणार नाहीत.

Super Blood Moon And Lunar Eclipse Can Be Seen In India Know Everything About It

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणावेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.