ज्या नदीचं पाणी इतकं स्वच्छ आणि निर्मळ आहे की, त्यातील खाली असलेले दगड आरामात दिसू शकतात. तसेच या नदीचे पाणी दिसायला काचेसारखे आहे. होय, खाली दिलेल्या चित्रातून तुम्हाला या नदीच्या स्वच्छतेची कल्पना येईल.
Aug 23, 2021 | 5:17 PM
जेव्हा जेव्हा एखाद्या नदीबद्दल चर्चा होते, तेव्हा लोक तिच्या स्वच्छतेबद्दल नक्कीच बोलतात. भारतातील नद्या अतिशय घाणेरड्या असल्याचीही अनेकांची तक्रार असते. पण भारतात एक अशी नदी आहे, जी केवळ स्वच्छतेमुळे ओळखली जाते. ज्या नदीचं पाणी इतकं स्वच्छ आणि निर्मळ आहे की, त्यातील खाली असलेले दगड आरामात दिसू शकतात. तसेच या नदीचे पाणी दिसायला काचेसारखे आहे. होय, खाली दिलेल्या चित्रातून तुम्हाला या नदीच्या स्वच्छतेची कल्पना येईल. (फोटो क्रेडिट- indiatravellife Insta Account)
1 / 5
या नदीचे नाव उमनगोट आहे. उमनगोट नदीला डौकी असेही म्हणतात. डौकी हे एक छोटे शहर आहे, जे भारत-बांगलादेश सीमेवर आहे. हे शिलाँगपासून 95 किलोमीटर अंतरावर आहे. (फोटो क्रेडिट- indiatravellife Insta Account)
2 / 5
डौकी येथे भारत आणि बांगलादेशदरम्यान एक व्यापारी मार्ग आहे, ज्यामधून अनेक ट्रक जातात. यासह हे मच्छीमारांसाठी एक आवडते ठिकाण आहे. (फोटो क्रेडिट-paradiseofnortheast)
3 / 5
ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी मानली जाते, जी दिसायला काचेसारखी आहे. त्यावर चालणाऱ्या बोटी हवेत तरंगताना दिसत आहेत. (फोटो क्रेडिट- timetraveller_official)
4 / 5
ही नदी मॉयलननोंग गावातून जाते. या गावाची विशेष गोष्ट म्हणजे साक्षरतेमध्येही हे गाव खूप पुढे आहे. नदीची स्वच्छता येथे लोकांच्या शिक्षित असल्याचा पुरावा देखील सादर करते. हे मत्स्यालयासारखे स्वच्छ दिसते.