AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG: इंग्लंडची 27 वर्षांची प्रतिक्षा संपली, स्मिथकडून द्रविडला झटका, पहिल्या दिवशी काय काय झालं?

AUS vs ENG 4th and Boxing Day Test : मेलबर्न कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे फलंदाज ढेर झाले. दोन्ही संघाचा पहिला डाव आटोपला. यासह या सामन्यात काही खास रेकॉर्ड झाले. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 26, 2025 | 6:01 PM
Share
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एशेज सीरिजमधील चौथा आणि बॉक्सिंग डे टेस्ट मॅच परंपरेनुसार यंदाही 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी गोलंदाजानी कहर केला. गोलंदाजांनी या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी एकूण 20 विकेट्स घेतल्या. या दरम्यान इंग्लंडच्या एका गोलंदाजाने कमाल केली.  (Photo Credit: PTI)

1 / 6
इंग्लंडने टॉस जिंकून कॅप्टन बेन स्टोक्स याचा निर्णय योग्य ठरवला. इंग्लंडने कांगारुंना 152 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडसाठी जोश टंग याने सर्वाधिक 5 विकेट्स घेत कारनामा केला. जोशने 5 विकेट्स घेण्यासह अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. (Photo Credit : Getty Images)

2 / 6
जोश टंग हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये गेल्या 27 वर्षांत इंग्लंडकडून 5 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. जोशआधी इंग्लंडच्या डॅरन गफ आणि डीन हेडली या दोघांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये अशी कामगरी केली होती. (Photo: Getty Images)

3 / 6
तसेच इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक यानेही कमाल केली.  ब्रूकने 41 धावांसह कसोटीत 2 हजार रन्स पूर्ण केल्या. डकेटचा यासह कसोटीत किमान 2 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 86.85 इतका स्ट्राईक रेट झाला आहे. ब्रूकनंतर स्ट्राईक रेटबाबत इंग्लंडचा बेन डकेट दुसऱ्या स्थानी आहे. डकेटचा स्ट्राईक रेट हा 86.11 इतका आहे.  (Photo: Getty Images)

4 / 6
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने या सामन्यात राहुल द्रविड याला कॅच घेण्याबाबत मागे टाकलं. स्मिथ यासह सर्वाधिक कॅच घेणारा दुसरा खेळाडू ठरला. स्मिथने कसोटीत 212 कॅच घेतल्या आहेत. द्रविडच्या नावावर 210 कॅचेसची नोंद आहे. तर हा वर्ल्ड रेकॉर्ड इंग्लंडच्या जो रुट (214 कॅचेस) याच्या नावावर आहे. (Photo: Getty Images)

5 / 6
तसेच बॉक्सिंग डे टेस्टसाठी ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये क्रिकेट चाहते उपस्थित असतात. यंदा चाहत्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला. चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी एकूण 94 हजार 199 क्रिकेट चाहत्यांनी उरस्थिती लावली होती. यासह 2015 रेकॉर्ड ब्रेक झाला.  एमसीजीमध्ये याआधी 2015 च्या वर्ल्ड कप फायनल सामन्याला 93 हजार 13 चाहत्यांनी  उपस्थिती लावली होती. (Photo: Getty Images)

6 / 6
Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....