AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये वापरलेला साबण अखेर जातो कुठे ? 90% लोकांना हे माहीतच नसेल…

आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी सर्व मोठ्या हॉटेल्समध्ये उपलब्ध असतात. साध्या साबणापासून ते टूथपेस्टपर्यंत ते खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू, तिथे सगळं काही उपलब्ध असतं. भारतात दररोज लाखो उत्पादने हॉटेलच्या रूममधून बाहेर फेकली जातात, ज्याचा फायदा गरिबांना होऊ शकतो.

हॉटेलमध्ये वापरलेला साबण अखेर जातो कुठे ?  90% लोकांना हे माहीतच नसेल...
हॉटेलमध्ये वापरलेला साबण कुठे जातो ?Image Credit source: social media
| Updated on: Jul 16, 2025 | 1:24 PM
Share

साधारणपणे, आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी सर्व मोठ्या हॉटेल्समध्ये उपलब्ध असतात. साध्या साबणापासून ते टूथपेस्टपर्यंत ते खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू, तिथे सगळं काही उपलब्ध असतं. तर काही हॉटेल्समध्ये दररोज शॅम्पू आणि साबण बदलले जातात, परंतु काही हॉटेल्समध्ये असे होत नाही. पण हॉटेलमध्ये आपण किंवा इतरांनी वापरून उरलेल्या साबणाचे काय केलं जातं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हो, जे शाम्पू आणि साबण इत्यादी आपण हॉटेलमध्ये वापरत नाही किंवा थोडेसे वापरून तसेच ठेवून देतो, ग्राहक हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचं काय केलं जातं, हे तुम्हाला माहीत आहे का ?

आज आपण ही माहिती जाणून घेऊ शकतो. बहुतेक लोकांना असं वाटतं की हॉटेलमध्ये राहणारे लोकं ज्या गोष्टी अर्धवट वापरतात, त्या नंतर फेकून दिल्या जातात. पण त्याचं खरं उत्तर काय आहे ?

वाचलेल्या साबणाचा हॉटेलमध्ये असा होतो वापर

ज्या गोष्टी आपण वापरत नाही आणि ज्या पॅक असतात, त्या इतर पाहुण्यांना दिल्या जातात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे पूर्णपणे खरे नाही. खरंतर, एका अहवालानुसार, हे उघड झाले आहे की काही ठिकाणी या गोष्टी कचऱ्यात टाकल्या जातात, पण दुसरीकडे असंही होतं की या गोष्टी अनेक गरीब लोकांच्या स्वच्छतेची समस्या सोडवण्यास मदत करू शकतात. याचा अर्थ असा की साबण वगैरे अशा गोष्टी काही अशा गरीब लोकांना दिल्या जाऊ शकतात, ज्यांना अशा गोष्टी विकत घेणं परवडत नाहीत आणि घाणीमुळे अनेक आजार होतात. 2099 मध्ये काही स्वयंसेवी संस्थांनीही या विषयावर एक मोहीम राबवली होती.

उर्वरित प्रॉडक्ट्स होतात रिसायकल

रिपोर्टनुसार, भारतात दररोज लाखो उत्पादने हॉटेलच्या रूममधून बाहेर फेकली जातात, ज्याचा फायदा गरिबांना होऊ शकतो. ही समस्या संपवण्यासाठी, क्लीन द वर्ल्ड आणि जगभरातील अनेक संस्थांनी ग्लोबल सोप प्रोजेक्टच्या सहकार्याने एक मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत, वापरलेल्या साबणांपैकी अर्धा साबण नवीन साबण बनवण्यासाठी वापरला जातो. याशिवाय, इतर उत्पादनांच्या बाबतीतही असंच काहीसं घडतं. नंतर ही रिसायकल केलेली प्रॉडक्ट्स विकसनशील देशांमध्ये पाठवली जातात. ज्या भागात स्वच्छ पाणी, साबण आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध नाहीत, त्या भागात राहणाऱ्या लोकांनाही या मोहिमेचा फायदा होऊ शकतो.

गरिबांच्या स्वच्छतेची घेतली जाते काळजी

स्थानिक पातळीवर अनेक स्वयंसेवी संस्था काम करतात ज्या दररोज मोठ्या हॉटेल्समधून विविध प्रकारची उत्पादने गोळा करतात आणि गरिबांमध्ये वाटतात. मात्र, गरजू लोकांना ती प्रॉडक्ट्स देण्यापूर्वी ती निश्चितपणे रिसायकल केली जातात एवढंच नव्हे तर, रिसायकलिंग दरम्यान, उरलेले साबण आणि इतरही सर्व उत्पादने ही निर्जंतुक केली जातात, जेणेकरून ती प्रॉडक्ट्स ज्यांना दिली जातील, ते कोणत्याही समस्येशिवाय त्यांचा वापर करू शकतील. त्यांची शुद्धता देखील तपासली जाते. आता, हॉटेलमध्ये उरलेला साबण पुन्हा वापरण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असला तरी, अजूनही अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे उरलेला साबण कचरा म्हणून फेकून दिला जातो. पण काही ठिकाणी ते नक्कीच रिसायकल केले जातात.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.