Video : खैरेंकडून बावनकुळेंची नक्कल… सूर्यासमोर दिवा… वर काय म्हणाले?

| Updated on: Sep 23, 2022 | 5:42 PM

आता टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाची कामं करा, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी बावन्नकुळे यांना दिलाय. भाजपाची संध्याकाळ कधीही होऊ शकते, असं वक्तव्य खैरेंनी केलंय.

Follow us on

औरंगाबादः अमित शहांसमोर (Amit Shaha) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणजे सूर्यासमोर दिवा, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलंय. यावर चंद्रकांत खैरेंनी हलक्यातच प्रतिक्रिया दिली. आधी तर बावनकुळे कसे बोलतात, याची खैरेंनी नक्कलच करून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर बोलायला बावनकुळे हे खूपच ज्युनियर आहेत ,असं ते म्हणालेत. उद्धव ठाकरेंना दिवा म्हटले तर अमित शहांना सूर्य म्हटलेत. सूर्य हा संध्याकाळी मावळतो. पण देवासमोरचा दिवा सलग ठेवला जातो. त्यामुळे दिवा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाची कामं करा, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी बावन्नकुळे यांना दिलाय. भाजपाची संध्याकाळ कधीही होऊ शकते, असं वक्तव्य खैरेंनी केलंय.