धुळ्यात ‘स्पेशल 26’, भुजबळांच्या नावावर रेशन दुकानदाराकडून दोन लाखांच्या खंडणीची मागणी

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावात विजय नारायण सोनवणे यांचे रेशनचे दुकान (Dhule Ration Shop owner fake gang demand Ransom) आहे.

धुळ्यात 'स्पेशल 26', भुजबळांच्या नावावर रेशन दुकानदाराकडून दोन लाखांच्या खंडणीची मागणी
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 5:12 PM

धुळे : तुम्हाला ‘स्पेशल 26’ हा चित्रपट आठवतो का? त्या चित्रपटात (Dhule Ration Shop owner fake gang demand Ransom) काही हुशार चोरांनी व्यापारी तसेच राजकीय नेत्यांना बनावट आयकर अधिकारी बनून लुटले होते. अशीच घटना धुळ्यातील शिरपूर तालुक्यात घडली. यात चोरांनी कोणी आयकर अधिकारी नाही तर चक्क अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने आल्याचे सांगितले. नाशिक येथील एक पुरुष आणि दोन महिलांनी रेशन दुकानदारांकडून दोन लाखांची खंडणी मागितल्याचे उघड झाले.

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावात विजय नारायण सोनवणे यांचे रेशनचे दुकान आहे. सोमवारी 13 जुलैला सोनवणेंच्या दुकानांसमोर काळ्या रंगाची स्विफ्ट कार उभी राहिली. या कारमधून दोन महिला आणि एक पुरुष असे तीन जण उतरले. त्यांच्यासोबत शिंगावे येथील स्थानिक रहिवासी होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्यांनी विजय सोनवणे यांच्याकडे जाऊन आम्ही छगन भुजबळ यांच्या आदेशाने तुमच्या रेशन दुकानात तपासणीसाठी आल्याचे सांगितले.

त्यांनी संपूर्ण दुकानातील कागपत्रे आणि दुकानाची तपासणी केली. त्यानंतर रेशन दुकानदार सोनवणे यांना दम देऊन तुमच्या रेशन दुकानात मोठी अफरातफर झाल्याचे सांगितले. तुम्ही गरजू लोकांना धान्य वाटत नाहीत. जर हे प्रकरण मिटवायचे असणार तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. (Dhule Ration Shop owner fake gang demand Ransom)

मात्र सोनवणे यांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी शिरपूर तहसीलदारांना याबाबतची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी असे कुठलेही पथक आलेले नसल्याचे सांगितले.

त्यानंतर सोनवणे यांना तात्काळ जवळच्या नागरिकांना आवाज देण्यास सुरुवात केली. गर्दी जमत असल्याचे बघितल्यानंतर संशयितांना कारमध्ये बसून तेथून पळ काढला. याबाबत चार संशयितांविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या चौघांना अटक करण्यात आलेली (Dhule Ration Shop owner fake gang demand Ransom) नाही.

संबंधित बातम्या : 

Chandrapur Crime | टीव्हीवर पाहून लहान भावाची हत्या, मृतदेह पुरला, पावसामुळे हत्येचं गुपित उलगडलं

शेजाऱ्यांशी भांडणाचा जाब विचारल्याने राग, वडील आणि भावाची चाकूने हत्या

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.