महाड शहरात काजलपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं.
1 / 7
ही दुर्घटना संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.
2 / 7
या इमारतीत 47 फ्लॅट्स होते. जवळपास 70 ते 80 जण या मलब्याखाली अडकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर स्थानिकांकडून 200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
3 / 7
इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली.
4 / 7
इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे.