Hero Splendor iSmart 110 चा बीएस-6 मॉडेल लवकरच लाँच होणार

हीरो मोटोकॉर्पने जूनमध्ये या बाईकसाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीचं (ICAT) बीएस-6 सर्टिफिकेट मिळवलं. त्यासोबतच बीएस-6 सर्टिफिकेट हासिल करणारी देशातील पहिली दुचाकी कंपनी बनली आहे.

  • Updated On - 11:58 pm, Sat, 7 September 19 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
Hero Splendor iSmart 110 चा बीएस-6 मॉडेल लवकरच लाँच होणार

मुंबई : Hero MotoCorp त्यांची प्रसिद्ध बाईक Splendor iSmart 110 चा बीएस-6 मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे (Hero Splendor iSmart 110 BS-6 Model). ही बाईक कंपनीचा पहिला बीएस-6 मॉडेल असेल. नवीन स्प्लेंडर हीरोची डीलरशिपसाठी डिस्पॅचही सुरु झाला आहे. सध्या या बाईकला ट्रेनिंग आणि बाईक संबंधी इतर माहितीसाठी डीलरशिपला दिलं जात आहे. ही बाईक लवकरच लाँच होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

या बाईकच्या डेव्हलपमेंटशी संबंध असलेल्या एका व्यक्तीने इकनॉमिक टाईम्सला सांगितलं, बीएस-6 स्प्लेंडर आईस्मार्ट 110 या आठवड्याच्या सुरुवातीलाच डिस्पॅच झाला होता. तर काही डीलरशिपवर लवकरच पोहोचतील. तसेच, हीरो मोटोकॉर्पच्या प्रवक्त्यांनी मात्र याबाबत बोलण्यास टाळलं.

एका सूत्रानुसार, बीएस-6 स्प्लेंडर आईस्मार्ट 110 ची किंमत सध्याच्या मॉडेलच्या 12-15 टक्क्यांनी जास्त असेल. म्हणजेच ही नवी बाईक जवळपास 6-7 हजार रुपये महाग असेल. सध्या या बाईकची किंमत 56,280 रुपये आहे.

हीरो मोटोकॉर्पने जूनमध्ये या बाईकसाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटीव्ह टेक्नॉलॉजीचं (ICAT) बीएस-6 सर्टिफिकेट मिळवलं. त्यासोबतच हीरो मोटोकॉर्प ही बीएस-6 सर्टिफिकेट मिळवणारी देशातील पहिली दुचाकी कंपनी बनली आहे. बीएस-6 स्प्लेंडर आईस्मार्ट 110 ला जयपूर, राजस्थान येथील कंपनीच्या रिचर्स आणि डेल्हलपमेंट हब CIT (सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी) येथे डिझाईन आणि डेव्हलप करण्यात आलं आहे. बीएस-6 एमिशन नॉर्म्स एप्रिल 2020 पासून लागू होतील.

Splendor iSmart 110 चा पॉवर

स्प्लेंडर आईस्मार्ट 110 च्या सध्याच्या मॉडेलमध्ये 109.15 cc, एयर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 9.4 hp पॉवर आणि 5,500 rpm वर 9 Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिन 4-स्पीड गियरबॉक्स युक्त आहे. बीएस-6 मॉडेलचा पॉवर आऊटपुटही सध्याच्या मॉडेल इतकाच असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Evolet च्या 3 ई-स्कूटर आणि 1 ई-क्वॉड-बाईक लाँच, किंमत फक्त…

स्कुटी 15 हजारांची, चालान 23 हजारांचं फाडलं, पोलिसांनी गाडी जप्त केली

Renault ची MPV Triber लाँच, किंमत फक्त…

Petrol की Diesel? कोणती कार खरेदी करणे फायदेशीर ठरणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI