शेतकरी आंदोलनात डावे आणि माओवाद्यांची घुसखोरी; पीयूष गोयल यांचा दावा

रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. गोयल म्हणाले की, "हे आंदोलन आता डाव्यांच्या आणि माओवाद्यांच्या हाती गेलं आहे.

शेतकरी आंदोलनात डावे आणि माओवाद्यांची घुसखोरी; पीयूष गोयल यांचा दावा
ई-सांतामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 3:51 PM

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. गोयल म्हणाले की, “हे आंदोलन आता डाव्यांच्या आणि माओवाद्यांच्या हाती गेलं आहे. हे आंदोलन खरोखरच शेतकरी संघटनांनी केले असते तर आतापर्यंतच्या आश्वासनांनंतर ते मागे घेतले गेले असते. परंतु अनेक चर्चांनंतरही अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यांना अनेकदा आश्वासनं देण्यात आली, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयतन केला गेला. परंतु वारंवार आश्वासने देऊनही, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊनही, दुर्दैवाने हे आंदोलन अधिक तीव्र होत चाललंय. मुळात आता हा प्रकार वाढवण्यात काहीही अर्थ नाही.” (Infiltration of Leftist and Maoists in Delhi Farmers Protest; Piyush Goyal claims)

गोयल म्हणाले की, “सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. आम्ही त्यांच्या सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार आहोत. त्यांच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने MSP विषयी शेतकऱ्यांना लिखित गॅरंटी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शेतकऱ्यांनी बाजारांबाबत जो आरोप केला आहे. त्यावरही सरकारने उत्तर दिले आहे”. (शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, शासकीय बाजारांना कमकुवत केले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला खासगी बाजारांना अधिक प्रोत्साहन दिले जात आहे.)

गोयल म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रस्ताव ठेवले आहेत. कृषी कायद्यांमध्ये संशोधन आणि सुधारणा करुन राज्य सरकारे खासगी बाजारांमध्ये रजिस्ट्रेशनची व्यवस्था लागू करु शकतील, याबाबतचाही प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे अधिकार हिरावत नाहीत. उलट शेतकऱ्यांना त्यांचे पिक कोणत्याही ठिकाणी विकण्याची परवानगी दिली जात आहे. असे असतानाही हे आंदोलन अजूनही का सुरु आहे? या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट काय असेल? याचा केवळ एकच अर्थ आहे की, शेतकरी आंदोलन आता डाव्यांच्या ताब्यात आहे. डाव्यांनी आणि माओवाद्यांनी हे आंदोलन हायजॅक केलं आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची नाही, तर देशविरोधी शक्ती आणि देशविरोधी लोकांची मागणी आहे की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत”.

गोयल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, “त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, तसेच डावे आणि माओवादी शक्तींपासून दूर राहावं. अनेक माध्यमांनी अशी माहिती दिली आहे की, दिल्लीत सुरु असलेलं शेतकरी आंदोलन डाव्यांनी आणि माओवाद्यांनी हायजॅक केलं आहे. डाव्यांनी, माओवाद्यांनी या आंदोलनात घुसखोरी केली आहे. काही मीडिया रिपोर्ट्स असं सांगतात की, या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये असे काही नेते आहेत, जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गुन्हेगारी इतिहास असलेले काही नेते या आंदोलनाद्वारे देशात अराजकता पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत”.

नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा, जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांची भूमिका

एकिकडे देशभरात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन होत आहे. दुसरीकडे जागतिक स्तरावरील तज्ज्ञांनीही या कायद्यंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांनी या कायद्यांचा अभ्यास करुन हे कायदे उद्योगपतींच्या फायद्याचे असल्याचं मत नोंदवलं आहे. भारतात कृषी क्षेत्रात मोठ्या बदलांची गरज आहे. मात्र, हे कायदे त्यासाठी उपयोगाचे नाही, असंही त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करत त्यांच्या नैतिक बळाला सलाम केला.

कौशिक बासू म्हणाले, “मी भारतातील नव्या कृषी कायद्यांचा अभ्यास केला. अभ्यासानंतर हे कायदे सदोष असल्याचं आणि शेतकऱ्यांसाठी हानिकारक असल्याचं लक्षात आलं. आपल्या देशात कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदलांची गरज आहे, पण नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांपेक्षा अधिक फायदा उद्योगपतींनाच होईल. भारतीय शेतकऱ्यांच्या संवेदनशीलतेला आणि नैतिक बळाला सलाम.”

संबंधित बातम्या

Kisan Andolan : कृषी कायद्याविरोधात आंदोलन आणखी पेटणार, 1500 ट्रकसह 30,000 शेतकरी दिल्लीत धडकणार

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कृषी कायद्यावरुन भाजप Vs पवार, पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत फडणवीसांकडून घेरण्याचा प्रयत्न

(Infiltration of Leftist and Maoists in Delhi Farmers Protest; Piyush Goyal claims)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.