Mumbai Sakinaka Case | आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी, 307, 376 कलमनुसार गुन्हा दाखल- हेमंत नगराळे

| Updated on: Sep 11, 2021 | 3:57 PM

आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केलाय.

Follow us on

साकिनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय. साकीनाक्यातील घटना दुर्दैवी आहे. हा प्रकार निंदनीय आहे. 10 तारखेला 3 वाजून 20 मिनिटांनी खैराणी रोड, साकीनाका इथं ही घटना घडली आहे. आम्हाला कॉल आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी महिला गंभीर अवस्थेत आढळून आली होती, अशी माहिती नगराळे यांनी दिली.

जखमी महिलेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आरोपीविरोधात 307, 376 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहन या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं आहे. तो जोनपूरचा रहिवासी आहे. या आरोपीच्या अंगावर रक्ताचे डाग होते. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केलाय.