AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E20 पेट्रोलविरोधात देशभरात एल्गार, नितीन गडकरी यांचं मोठं विधान, बदलावे लागणार वाहनांचे कोणते पार्ट्स?

E20 Ethanol Petrol- Nitin Gadkari: ई20 इंधनामुळे देखभाल खर्च वाढला तर मायलेजवरही मोठा परिणाम झाल्याच्या तक्रारी वाढलेल्या असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी वाहनांचे मायलेज का घसरले याचे कारण सांगितले आहे. केवळ इथेनॉल पेट्रोलवर खापर फोडून चालणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

E20 पेट्रोलविरोधात देशभरात एल्गार, नितीन गडकरी यांचं मोठं विधान, बदलावे लागणार वाहनांचे कोणते पार्ट्स?
E20 पेट्रोलविरोधात देशभरात एल्गार, नितीन गडकरी यांचं मोठं विधान
| Updated on: Jul 30, 2026 | 9:44 AM
Share

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत मोठे वक्तव्य केले आहे. E20 पेट्रोलविरोधात देशभरात नाराजीचा सूर आहे. विरोधकांसह काही संघटनांनी 4 ऑगस्ट रोजी याविरोधात संसदेवर मोर्चाची हाक दिली आहे. त्याचवेळी गडकरी यांचे वक्तव्य आले आहे. वर्ष 2016 पूर्वी निर्मित भारत स्टेज (BS)-III वाहनं ही ई20 पेट्रोलवर चालवण्यामुळे त्यांच्यातील काही रबरी भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज पडू शकते. पण मोठा तांत्रिक बदल करण्याची गरज नाही. नियमित सर्व्हिसिंग दरम्यान हे पार्ट्स सहज बदलता येऊ शकतात, असे गडकरी म्हणाले.

राज्यसभेत गडकरींची मोठी माहिती

राज्यसभेत गडकरी यांनी लिखीत उत्तर दिले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), इंडियन इन्स्टिटयूट ऑफ पेट्रोलियम (IIP), डेहराडून, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मैन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांनी अगोदरच E20 पेट्रोलच्या वापराचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, E20 पेट्रोलच्या वापरासाठी कार आणि दुचाकी इंजिनात कोणताही मोठा बदल करण्याची गरज नाही असे समोर आल्याचे गडकरी यांनी माहिती दिली.

काही रबर पार्टस आणि गॅस्केट बदलण्याची गरज

जुन्या वाहनात E20 इंधनाच्या वापरानंतर काही भाग खराब होऊ शकतात. या अभ्यासात चालकाची क्षमता, वाहन स्टार्ट होण्याची क्षमता, धातूवरील परिणाम आणि प्लास्टिक पार्टसवरील परिणाम दिसून आला आहे. त्यात काही नुकसान संभवते असा दावा करण्यात येत आहे.’1 एप्रिल 2005 पासून सुरू झालेले आणि 2016 पूर्वी निर्मित BS-III वाहनांच्या चाचणीत काही रबरी भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज समोर आली आहे. वाहनांच्या नियमित सर्व्हिसिंग दरम्यान ही कमी दूर करता येऊ शकते.’ असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

E20 पेट्रोलचा मायलेजवर काय परिणाम?

ईंधनाचा खर्च आणि मायलेजविषयी चिंता करण्यात येत आहे. वाहनांचे मायलेज अनेक कारणांमुळे कमी होते. पण केवळ E20 पेट्रोलचा वापरामुळे मायलेज कमी झाले असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही असे गडकरी यांनी स्पष्ट केले. वाहन उत्पादक कंपन्या आणि वाहन तपासणी एजन्सीने पण स्पष्ट केले आहे की, मायलेज हे वाहन चालवण्याची पद्धत, वाहनाची स्थिती, रस्ता आणि इतर काही कारणांचा मायलेजवर परिणाम होत असल्याचे गडकरी म्हणाले. तर इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल हा टप्प्याटप्प्याने शास्त्रीय तपासण्या आणि सर्व संबंधित पक्षांच्या चर्चेनंतर लागू करण्यात आल्याचा दावाही गडकरी यांनी केला आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग