AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांना बोनस, दिवाळीत एसटीच्या तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या

नव्या निर्णयानुसार एसटी महामंडळाकडून 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधित बसेसच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या होणार आहेत. कोरोना संसर्ग आणि दिवाळीमुळे बसस्थानकावर होणारी गर्दी या गोष्टी लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांना बोनस, दिवाळीत एसटीच्या तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या
| Updated on: Oct 28, 2020 | 5:05 PM
Share

मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने बस फेऱ्यांसदर्भात मोठा घेतला आहे.नव्या निर्णयानुसार एसटी महामंडळाकडून 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधित बसेसच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या होणार आहेत. कोरोना संसर्ग आणि दिवाळीमुळे बसस्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‌ॅड. अनिल परब यांनी दिली आहे. (on occasion of Diwali 1 thousand extra rounds of buses announced by MSRTC)

नव्या आदेशानुसार आगाऊ बसेस 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधित महाराष्टभर धावतील. या बसेस राज्यातील प्रमुख बसस्थानकांवरुन सुटणार असून त्यासाठी आगाऊ आरक्षणाची सोय टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. आगाऊ आरक्षणासाठी प्रवासी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले आसन आरक्षित करु शकतील.

दरम्यान, दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळामार्फत दरवर्षी जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील एसटी महामंडळाने बस फेऱ्या वाढवल्या आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे यावेळी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्याला मास्क लावणे यासारखे प्रतिबंधात्मक नियम काटेकारपणे पाळावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त एसटी प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश महामंडळाच्या मुख्यालयातून देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

तब्बल 219 दिवसांनंतर ‘आपली बस’ प्रवाशांच्या सेवेत; नागपूरकरांना दिलासा

सांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची बाधा

गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; एसटीच्या कंडक्टरला अटक

(on occasion of Diwali 1 thousand extra rounds of buses announced by MSRTC)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.