खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे : अर्जुन खोतकर

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा लागलेली आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे : अर्जुन खोतकर

मुंबई :  एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा लागली आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. (Pankaja munde Should join Shivsena Says Arjun Khotkar)

“मागच्या 5 वर्षांमध्ये भाजपने जी काही भरती आली होती, ती आता ओसरायला लागलीये. नाथाभाऊंसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपचे आणखीही बरेचसे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील येत्या काळात त्यांच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील”, असा दावा खोतकर यांनी केला.

एकनाथ खडसे हे भाजप सोडून गेल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होईल का? यावर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, “शिवसेनेची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत. पंकजा ताईच काय राज्यातला कुणीही नेता ज्याला सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करायचंय, अशा नेत्यांना शिवसेनेची दारं उघडी आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करु”.

खडसेंच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोपरखळी लगावली आहे. यशाची शिखरं पादाक्रांत करत असताना पायाची दगडं का निसटत आहेत, याचा विचार भाजपनं करावा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही- प्रकाश मेहता

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर नाराज नेते प्रकाश मेहता यांनी एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, असा निर्धार बोलून दाखवला आहे. “पक्षात कोणतेही निर्णय एक व्यक्ती घेत नाही. एका व्यक्तीला दोष देऊन आपण पळवाट काढावी हे योग्य नाही. पक्षाच्या विचारानुसार काम करत असताना मतभेद असतात मात्र मनभेद नसावेत. कोणतेही कारण देऊन पक्षावर दोष देणे योग्य नाही असं मला वाटतं”

(Pankaja munde Should join Shivsena Says Arjun Khotkar)

संबंधित बातम्या

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार

…म्हणून मोदींवर टीका करणारं ‘ते’ ट्विट डिलीट केलं : एकनाथ खडसे

Published On - 4:07 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI