Swargate Crime Updates : स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
Swargate Case Investigation : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याच्या तपासाला आता वेग आलेला आहे. पोलिसांकडून आरोपीच्या गावी त्याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी ड्रोन आणि डॉगस्कॉडचा वापर पोलीस करत आहेत.
स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे. ऊसाच्या शेतात आरोपी लपलेला असल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्याचा शोध आता ड्रोनच्या माध्यमातून घेतला जात आहे.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात काल शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना करण्यात आलेली आहे. तर आरोपी हा ऊसाच्या शेतात लपलेला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे ड्रोनच्या मदतीने पुणे पोलीस आता आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी बसने गावी गेला होता. त्याला आजूबाजूच्या परिसरातील काही नागरिकांनी पहिलं असल्याने पोलीस आरोपीच्या गावी त्याचा शोध घेत आहेत. डॉगस्कॉडच्या मदतीने देखील आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदरीतच या प्रकरणी तपासाला वेग आलेला बघायला मिळत आहे.
