AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या ‘हा’ खास काढा, वाचा !

सध्याच्या कोरोना काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेष करून आपण हेल्दी आणि सकस आहार घेतला पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या 'हा' खास काढा, वाचा !
खास पेय
| Edited By: | Updated on: May 25, 2021 | 9:21 AM
Share

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेष करून आपण हेल्दी आणि सकस आहार घेतला पाहिजे. आपण काय खातो यावर आपली रोगप्रतिकारक शक्ती अवलंबुन आहे. यामुळे या काळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असेच पदार्थ आहारात घेतले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (Ayurvedic extracts are very beneficial for health)

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. विशेष म्हणजे घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास पेय तयार करण्यासाठी हळद, पुदिना, काळी मिरी, हिंग, लसणाच्या चार ते पाच पाकळ्या, गुळ आणि तुळशीची पाने घ्या.

एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी मंद आचेवर ठेवा. त्यामध्ये सर्वात अगोदर काळी मिरी आणि हिंग घाला. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला आणि पाच मिनिटे तसेच ठेवा. यानंतर यामध्ये गुळ, पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने घाला आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर हा काढा एका ग्लासमध्ये काढा आणि प्या.  तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या.

जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढा उष्ण पदार्थांपासून बनवला जातो. याच्या अति सेवनामुळे तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, अॅसिडीटी, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. लघवी करताना मूत्र मार्गात जळजळ उद्भवू शकते. असे काही तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. तसेच, काढ्याचे सेवन टाळा.

काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात. काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Ayurvedic extracts are very beneficial for health)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.