रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या किवी आणि पालकाचा ज्यूस, वाचा !

सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या किवी आणि पालकाचा ज्यूस, वाचा !
किवी ज्यूस
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 9:03 AM

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक खास ज्यूस सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण दररोज सकाळी किवी आणि पालकाचा ज्यूस पिला पाहिजे. (Drink kiwi and spinach juice every morning to boost the immune system)

चार ते पाच पालकाची पाने आणि एक किवी एकत्र मिक्स करा आणि बारीक करून घ्या आणि प्या. हे खास पेय दररोज सकाळी प्या. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे किवीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महाराष्ट्रात ज्याप्रकारे कोरोनाचा कहर सुरू आहे या वातावरणात तर किवी खाणे आपल्या आरोग्यासाठी आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी गरजेचे आहे.

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा दुप्पट आहे. व्हिटामिन सी व्यतिरिक्त व्हिटामिन के, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि आहारातील फायबर देखील किवीमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त किवी अँटि-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे. म्हणून केवळ प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीच नाहीतर, तर एकूण आरोग्यासाठी देखील किवी खूप फायदेशीर आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात.

पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते. या फ्री रेडिकल्समुळे कॅन्सरसारखे रोग होतात. पालकमध्ये ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

(Drink kiwi and spinach juice every morning to boost the immune system)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.