कोरोनावर मात करण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ पदार्थ, होतील अनेक फायदे !

देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू देखील लावण्यात आले आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी आहारात घ्या 'हे' पदार्थ, होतील अनेक फायदे !
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 5:43 PM

मुंबई : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन देखील लावण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकजण कोरोना बाधित झाले आहेत. कोरोना झाल्यानंतर आहारात नेमके काय घ्यावे हे अनेकांना कळत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोरोना झाल्यानंतर आपण आहारात नेमके काय घ्यावे. (Eat these foods during the corona period)

भाज्यांमध्ये विटामीन आणि खनिजांचे भरपूर प्रमाण असते, जे आपल्या शरीरात उर्जा निर्माण करते. यासाठी हंगामी भाज्यांचे भरपूर सेवन करा. यामुळे आपल्या शरीरातील विटामीनचे प्रमाण संतुलित राहते. तसेच आपल्या नाश्त्यामध्ये डाळींब, सफरचंद, पपई यासारख्या विविध प्रकारच्या फळांचा समावेश करा. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.

पाणी हे शरीरासाठी वरदान आहे. जेव्हा तुम्ही रिकव्हर होत असता तेव्हा आपले डिहायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आपण नारळ पाणी, सरबत ही पिऊ शकता. दूध शरीरासाठी लाभदायी मानले जाते. दुधामुळे शरीराला अनेक फायदे होतात. रोज रात्री झोण्यापूर्वी दूधामध्ये चिमूटभर हळद टाकून प्या. यामुळे आपली हाडे मजबूत होतील.

अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, जामुन असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने आजारातून लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल. तसेच, व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन आणि झिंकच्या गोळ्या घेत रहा कारण यामुळे आपल्या शरीरातून विष बाहेर पडण्यास मदत होईल. लिंबूवर्गीय फळे शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवतात. जे संक्रमणाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. आपण आपल्या आहारात पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, बदाम, गाजर, रताळे, केळी, शेंगदाणे, सोयाबीन, टोमॅटो हे समाविष्ट करा .

पारंपारिक मसाले जसे हळद, आले आणि काळी मिरी त्यांच्या इम्युनोमोडायलेटरी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांकरिता ओळखले जाते. लवंगा, दालचिनी, वेलची यासारखे मसाले देखील शरीराच्या अनेक समस्या सोडवतात. या मसाल्यांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आणि अँटीऑक्सिडेंट असतात यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. रिकाम्या पोटी तुळशीचे सात-आठ पाने खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Eat these foods during the corona period)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.