मकर संक्रांतीच्या दिवशी का खाल्ले जातात काळया तिळाचे लाडू ? तीळ दानाचे आहे काय महत्त्व!!

मकर संक्रांती सणाच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चना केली जाते सोबतच काळे तीळ आणि गुळाचे लाडू नैवेद्य म्हणून दिले जाते आणि हे लाडू भोग म्हणून चढवले जाते. चला तर मग जाणून घेऊया यामागील धार्मिक व वैज्ञानिक कारण...

मकर संक्रांतीच्या दिवशी का खाल्ले जातात काळया तिळाचे लाडू ? तीळ दानाचे आहे काय महत्त्व!!
laddu
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 7:15 AM

मुंबई : सूर्य देव जेव्हा धनू राशीमधून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो, यावर्षी मकरसंक्रांतीचा सण 14 जानेवारी 2022 रोजी साजरा केला जाईल. मकर राशी ही शनि देवाची राशी आहे. हिंदू धर्मामध्ये शनिदेव यांना सूर्यदेव यांचे पुत्र सुद्धा मानले जाते. या मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्यादेव आपला पुत्र शनि देव यांच्या घरी जातात.शनिदेव यांच्या घरी जाताना सूर्य एवढे तेजवान होतात की शनिदेव यांच्यापुढे त्यांचे तेज अतिप्रखर असते आणि या तेजापुढे त्यांचे पुत्र शनिदेव यांचे तेज फिके पडते.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा काळे तीळ द्वारे केली जाते सोबतच काळी डाळ, तांदूळ, तूप, मीठ, गूळ आणि काळे तीळ हे सारे पदार्थ सुर्यदेवांना दान केले जाते. काळे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून सेवन केले जातात आणि अनेकांना दान म्हणून सुद्धा दिले जातात. असे म्हटले जाते की, असे केल्याने सूर्यदेव आणिशनिदेव त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते आणि या दोन्ही देवांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते. आजच्या या लेखामध्ये आपण काळे तीळ आणि गूळ यांचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

काळे तिळाचे धार्मिक महत्त्व

ज्योतिष शास्त्रामध्ये काळे तीळ याचा संबंध शनिदेव यांच्याशी जोडला गेलेला आहे आणि गुळाचा संबंध हा सुर्यदेव यांच्याशी जोडला गेलेला आहे कारण की संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव हे शनि देव यांच्या घरी मकर राशीमध्ये प्रवेश करतात अशातच काळे तीळ आणि गूळ द्वारे बनवलेले लाडू सूर्य आणि शनी यांच्यामध्ये स्नेहसंबंध व मधुर संबंध निर्माण करणारा एक सुवर्ण मध्य ठरतो. ज्योतीष शास्त्रांमध्ये सूर्य व शनी हे दोन्ही ग्रह अतिशय बलवान व सशक्त मानले गेलेले आहेत. या संक्रांतीच्या सुवर्ण दिनी जो व्यक्ती काळे तीळ व गूळ यांच्याद्वारे बनवलेले लाडू सेवन करतो तसेच जी व्यक्ती या लाडूचे दान करते या व्यक्तीवर शनी देव व सूर्य देव यांची सूकृपा दृष्टी पडते व तसेच या दोन्ही देवतांचा कृपा आशीर्वाद ज्या व्यक्तीवर होतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी – आनंद सुख समृद्धी नांदू लागते.

काळे तिळाचे वैज्ञानिक महत्व

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे बनलेले लाडू खाणे आणि दान करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. खरेतर मकर संक्रांती हा सण उत्तर भारतामध्ये मोठा महोत्सव मानला गेलेला आहे. हा सण ज्यावेळी येतो त्यावेळी वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच या दिवसांमध्ये थंडी सुद्धा जोरात असते. अनेक लोक या दिवसांमध्ये थंडीने गारठून गेलेले असतात. गुळ आणि काळे तीळ हे दोन्ही पदार्थ उष्णता गुणधर्मांनी युक्त असतात. सर्दीच्या प्रभावापासून लोकांना वाचण्यासाठी त्यांना गूळ आणि तिळाचे लाडू दिले जाते सोबतच लोक या लाडूचे स्वतः सेवन करतात तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि परिणामी आपल्या शरीराला थंडी सुद्धा वाजत नाही. या दोन्ही पदार्थांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत राहते तसेच गुळाचे वैज्ञानिक व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्व सांगण्यात आलेले आहे,ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये र”क्ताची कमतरता असते त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याचे कार्य करते आणि म्हणूनच आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा सक्षम राहतो.

सूर्य आणि शनी यांची ही कथा सुद्धा आहे प्रसिद्ध..

काळे तीळ या संदर्भातील सूर्य देव आणि शनी देव यांची एक पौराणिक कथा सुद्धा प्रसिद्ध आहे.या कथेनुसार सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव यांना पसंत करत नसे याच कारणामुळे त्यांनी शनिदेवांना त्यांची आई यांच्या छाया पासून वेगळे केले होते.आई आणि मुलगा या दोघांना वेगळे केल्यामुळे सूर्यदेव यांना कुष्ठरोगाचा श्राप मिळाला होता. अशा वेळी सूर्यदेव यांचा दुसरा मुलगा यमराज यांनी कठोर तप करून सुर्यदेवांना कुष्ठरोगातून मुक्त केले होते.

रोगातून मुक्त झाल्यानंतर सूर्यदेवाने रागात येऊन शनी देव आणि त्यांची आई छाया यांच्या घरी कुंभ जाळला. सूर्य देवांनी या उचललेल्या पावलामुळे शनि आणि छाया खूपच वेगळे झाले मग यमराजांनी सुर्यदेवांना समजावले त्यानंतर सुर्यदेवांना त्यांचा राग अनावर शांत करावा लागला. त्यानंतर आपला मुलगा शनि आणि छाया यांना भेटण्यासाठी ते त्यांच्या घरी सुद्धा गेले.

तिथे गेल्यावर पाहिले तर सर्व जळून खाक झाले होते, सगळ अस्ता विस्ता होऊन नष्ट झाले होते, फक्त काळे तीळ जळत होते. सूर्यदेव जेव्हा घरी आले तेव्हा शनिदेव यांनी त्यांचे स्वागत फक्त काळे तीळ द्वारे केले होते त्यानंतर सूर्यदेवाने शनिदेवांना दुसरे मकर (घर) मिळवून दिले त्यानंतर सूर्या देवांनी शनिदेवांना सांगितले की,जेव्हा तुम्ही आपल्या नवीन घरी याल तेव्हा तुमचे गेलेले सर्व वैभव तुम्हाला प्राप्त होईल. सोबतच जी कोणी व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ व गूळ याद्वारे सूर्यदेवाची पूजा करेल त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संपून जातील.त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदी आनंद सुख शांती वैभव निर्माण होईल असा आशीर्वाद सुद्धा दिला.

त्या व्यक्तीला सूर्य देव शनी देव यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनातील सूर्य पिडा व शनिपीडा सुद्धा संपून जाईल असा आशीर्वाद सुद्धा दिला आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळ यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

इतर बातम्या : 09 January 2022 Panchang : रविवारचा दिवस कसा जाईल ? जाणून घ्या पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Guru Gobind Singh Jayanti 2022 | सुखी आयुष्यासाठी गुरु गोविंद सिंग यांचे अनमोल विचार आत्मसात करा

Vastu tips : घरात सुख- शांती नांदावी असे वाटत असेल तर घरातील भिंती रंगवा “या” रंगांनी…!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.